Pathaan Movie Housefull esakal
नाशिक

Pathaan Movie Release : दर दुप्पट असूनही ‘पठाण’ नाशिकमध्ये हाउसफुल्ल!

सकाळी सातपासून रात्री बाराला शेवटचा शो सुरू होणार

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : देशात गेले काही दिवस बॉयकॉट सिनेमा हा राजकीय ट्रेंड सुरू केला होता. मात्र ‘पठाण’ चित्रपटाने त्यावर मात केली असून, चित्रपट शौकिनांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला नाही. २५ जानेवारीपासून चित्रपट प्रदर्शित होणार आहे. नाशिक शहरात या चित्रपटाचे रोज चक्क ६६ शो होणार आहेत.

विशेष म्हणजे, यानिमित्ताने पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत चित्रपट दाखविण्याचा मालेगाव शहरातील ट्रेंड नाशिकमध्ये अवतरला आहे. या चित्रपटाचा पहिला खेळ सकाळी सातला, तर शेवटचा खेळ मध्यरात्री बाराला सुरू होणार आहे. दिवसभरात वीस तास पठाण चित्रपट दाखविला जाईल. (Pathaan Movie Release house full in Nashik despite double ticket price and boycott trend nashik news)


या चित्रपटावर बॉयकॉट करण्यासाठी सोशल मीडियावर चळवळ सुरू होती. काही तथाकथित हिंदुत्ववादी संघटनांनी याबाबत चळवळ चालविली होती. त्यामुळे राजकीय पक्ष, संघटना, नेते यांच्यात त्यावर गरमागरम चर्चा होती. चित्रपटाबाबत अनेक तक्रारी आल्याने सेन्सॉर बोर्डाने देखील चित्रपटात काही बदल सुचवले होते. त्यामुळे हा चित्रपट चालेल का? याबाबत साशंकता होती.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ नुकतेच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी मुंबई शहरात विविध घटकांशी बैठक घेऊन चर्चा केली होती. त्यात देखील अभिनेता सुनील शेट्टी यांनी ‘बॉयकॉट ट्रेंड’विषयी चिंता व्यक्त केली होती. अभिनेता अमीर खान यांच्या लालसिंग चढ्ढा सिनेमाला या ट्रेंडची झळ बसली होती. मात्र अॅक्शनपट पठाणने त्यावर मात केल्याचे दिसते.

हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

नाशिक शहरात दी झोन मल्टिप्लेक्सला १२, सिनेमॅक्स (सीटी सेंटर मॉल) येथे २१, आयनॉक्स १०, दिव्य अॅडलॅब्ज (सिडको) १४ आणि सिनेमॅक्स रेजिमेंटल प्लाझा येथे ९, असे रोज ६६ शो होणार आहेत. पहिला शो सकाळी सातला, तर शेवटचा शो रात्री बाराला आहे.

याचा अर्थ वीस तास पठाण चित्रपट दाखविला जाणार आहे. सकाळच्या खेळाचे दर सामान्यपणे शंभर रुपये, तर मुख्य शोचे तिकीट दर ३०० रुपये असताना या सिनेमासाठी सकाळच्या शोचे दर तीनशे, तर मुख्य शोचे तिकीट दर ४८० म्हणजे जवळपास दुप्पट करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

SRH vs RR Live: इशान किशन बरसला, हेनरिच क्लासनही जबरदस्त खेळला; पण, राजस्थानच्या गोलंदाजांचे पुनरागमन, नितीश रेड्डी भिडला

MPSC Success Story: पहुरजिऱ्याचा अजय दिघडेचा पराक्रम; MPSC उत्तीर्ण होऊन असिस्टंट कमिशनर पदावर झेप, आई-वडिलांच्या कष्टांना यशाची किनार..

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

SCROLL FOR NEXT