immoral 1.jpg 
नाशिक

शेजारचाच आवडत होता तिला...शेवटी पतीने..

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : संशयित गव्हाणे आणि नरपतसिंह गावित हे दोघे पाथर्डी गावात शेजारी-शेजारी राहत होते. पंधरा दिवसापूर्वी दोघांचे भांडण झाले होते. त्यामुळे घरमालकाने संशयित विठ्ठल गव्हाणे यास घर खाली करून काढून दिले होते. दरम्यान गावित हा कंपनीत जाण्यासाठी पाथर्डी-गौळाणे रस्त्याने जात होता. त्यावेळी पत्नी अन् गावित यात अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पतीने मात्र..

तो पुन्हा घरी आल्याची माहिती पोलीसांना मिळाली...

इंदिरानगर येथील पाथर्डी गावात एका महिन्यापूर्वी पत्नीच्या कथित प्रियकराचा खून करून फरार झालेल्या पाथर्डी गावातील दाढेगाव रस्त्यावर राहणारे नरपतसिंह गावित याला संशयित विठ्ठल गव्हाणे याने कोयत्याने वार करून ठार मारले होते. हे दोघेही एकमेकांच्या शेजारी राहत. घटनेच्या पंधरा दिवसांपूर्वी या दोघांचे भांडण झाले होते. यामुळे संबंधित घरमालकाने गव्हाणे याच्याकडून घर खाली करून घेतले होते. विठ्ठल याने नरपतसिंगवर दाढेगाव रस्त्यावर अचानक हल्ला चढवत डोक्‍यावर आणि शरीरावर कोयत्याने वार केले होते. त्यावेळी संशयित विठ्ठल गव्हाणे याने त्याच्यावर कोयत्याने हल्ला चढविला. डोक्‍यावर आणि शरीरावर कोयत्याने सपासप वार केल्यामुळे मोठ्याप्रमाणात रक्तश्राव झाल्याने गावितची परिस्थिती गंभीर होती. यात त्याचा मृत्यू झाला होता. इंदिरानगर पोलिसांनी गव्हाणेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. घटनेच्या दिवसापासून गव्हाणे फरारी होता. तो पुन्हा घरी आल्याची माहिती मिळाल्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्यास बेड्या ठोकल्या. 

अनैतिक संबंध असल्याचे प्राथमिक तपासातून समोर
घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण, गुन्हे शोध पथकाचे दत्तात्रय पाळदे, संदीप लांडे, जावेद खान, सागर पाटील हे घटनास्थळी पोहोचले होते. जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, त्याचा मृत्यु झाला. दरम्यान, संशयित गव्हाणे याच्या पत्नीशी गावितचे अनैतिक संबंध असल्याचे प्राथमिक तपासातून  समोर आले. संशयित गव्हाणे फरार झाला होता. पोलिस त्याचा शोध घेत होते.मात्र तो पुन्हा घरी आल्याची माहिती मिळाल्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्यास बेड्या ठोकल्या. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT