Fule nagarf.jpg 
नाशिक

"लॉकडाऊनमध्ये घरात तर बसू..पण जागाच नाही तर राहणार कुठे?"जागेअभावी नागरिक रस्त्यावर 

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मुंबईच्या दाट लोकवस्तीच्या भागात वास्तव्य करताना कुटुंबातील दोन घरात तर चार बाहेर, अशी स्थिती असल्याने कोरोनावर नियंत्रण ठेवणे अवघड होऊन बसले आहे. तशीच स्थिती पंचवटी विभागातील फुलेनगर भागात आहे. गेल्या दोन दिवसांपासून बाजार समितीचे कामकाज पूर्णपणे बंद असल्याने घरांमध्ये जागा नाही, त्यामुळे या भागात प्रतिबंधित क्षेत्र व संचारबंदी असतानाही नागरिक रस्त्यावर दिसत आहेत. ​

घरात कंपन्यांतील शिफ्टप्रमाणेच वास्तव्य

बाजार समितीत हमाल म्हणून यातील पन्नास टक्के लोक काम करतात. चोवीस तास चालणाऱ्या बाजार समितीत एकाच कुटुंबातील आई-वडील सकाळच्या सत्रात काम करतात, तर सायंकाळनंतर त्याच कुटुंबातील मुले काम करतात. त्यामुळे घरात कंपन्यांतील शिफ्टप्रमाणेच वास्तव्य राहाते. कोरोनामुळे प्रथमच बाजार समिती बंद असल्याने कुटुंबातील सर्वच सदस्यांना घरात बसण्याची वेळ आली आहे. झोपडपट्टी वजा घरामध्ये जागा कमी असल्याने घराबाहेर पडण्याशिवाय पर्याय नसल्याने लॉकडाउन काळात व प्रतिबंधित क्षेत्र जाहीर होऊनही नागरिकांचा संचार पेठ रोड व दिंडोरी रोडवर कायम आहे. 

हातावर पोट असणारे घराबाहेर 
पेठ रोडवरील रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या फुलेनगर व नवनाथनगर भागात कष्टकरी लोकांची संख्या अधिक आहे. 90 टक्के लोक बाजार समितीत काम करतात. दहा टक्के लोक बांधकामांच्या साइटवर मजूर म्हणून काम करतात. कान साफ करणे, जडी-बुटी विकणे, वाजंत्री, गोंधळी, खेळणी विकणे, हत्यारांना धार लावणे, फुगे विकणे, डुकरे पकडणे, दगड फोडणे, दारू- ताडी विकणे आदी प्रकारचे कामे करतात. लॉकडाउनमुळे व्यवसाय बंद असल्याने बाजार समितीमधील हमालांप्रमाणेच यांनाही घरात जागा कमी असल्याने लॉकडाउन काळातही रस्त्यावर दिसत आहेत. 

90 टक्के वर्ग बाजार समितीच्या अर्थकारणाशी निगडित

पंचवटी विभागातील फुलेनगर भागात कालिकानगर, अवधूतवाडी, सम्राटनगर, महाराणा प्रतापनगर, भराडवाडी, तेलंगवाडी, फुलेनगर, विजय चौक, कातारी गल्ली, पाट परिसर, राजदूतनगर, गणेश चौक आदी महत्त्वाचे भाग येतात. या भागात चोवीस तास वर्दळ दिसते. त्याला कारण म्हणजे, या भागात वास्तव्य करणारा 90 टक्के वर्ग बाजार समितीच्या अर्थकारणाशी निगडित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MHADA: म्हाडाची पुन्हा लाॅटरी निघणार! ‘पीएमजीपी’तून मिळणार ९०० घरे, पन्नास टक्के जागेवर उभारणार सदनिका

आखाती युद्धाचा पर्यटनाला फटका! महिन्याभरापासून विमानसेवा विस्कळीत, ट्रॅव्हल एजन्सीतील प्रवाशांचे बुकिंग रद्द

Solapur Mangalevedha news: ‘बसव ज्योत’ सायकल यात्रेचे मंगळवेढ्यात जल्लोषात स्वागत; महात्मा बसवेश्वर राष्ट्रीय स्मारकासाठी जनजागृतीला वेग

Pune Ambegaon gas crisis: आंबेगावच्या पूर्व भागात गॅस पुरवठा ठप्प; ६० हजारांहून अधिक ग्राहक त्रस्त, उत्तर प्रदेश-बिहारमधील कुटुंबे परतगावी

IPL 2026, SRH vs LSG: रिषभ पंतच्या अर्धशतकाने लखनौने विजयाचं खातं उघडलं; रोमांचक सामन्यात काव्या मारनच्या हैदराबादचा घरात पराभव

SCROLL FOR NEXT