perimeter of Mumbai Naka Dwarka Circle will be reduced nashik news  esakal
नाशिक

Nashik News: मुंबई नाका, द्वारका सर्कलचा घेर कमी करणार; महापालिका सिग्नल यंत्रणा उभारणार

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : मुंबई- आग्रा महामार्गावरील महापालिका हद्दीतील मुंबई नाका व द्वारका सर्कल येथील वाहतूक कोंडी लक्षात घेऊन दोन्ही सर्कलचा घेर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई नाका येथील मायलन सर्कलचे काम सुरू झाले असून, राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीतील सर्कल तोडून तेथे भिंत उभारली जाणार आहे.

पुढच्या बाजूला सुशोभीकरण करून महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा अर्धाकृती पुतळा उभारला जाणार आहे. दोन्ही सर्कलचे घेर कमी करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून रस्ते तयार करून महापालिका सिग्नल यंत्रणा उभारणार आहे. (perimeter of Mumbai Naka Dwarka Circle will be reduced nashik news)

मुंबईकडून नाशिककडे आल्यानंतर मुंबई नाका येथे मायलन सर्कलला वळसा घालून द्वारकाकडे मुख्य किंवा सर्व्हीस रस्त्याने जावे लागते. किंवा पुन्हा यू- टर्न मारण्यासाठीदेखील मायलन सर्कलला वळसा घालून पुढे जावे लागते. परिणामी वाहतूक ठप्प होते. सायंकाळी वाहनांच्या लांब रांगा लागतात. त्यामुळे जवळपास दहा वाहतूक पोलिस अडीच ते तीन तास वाहतूक सुरळीत करण्याचे काम करतात.

वांरवार वाहतूक ठप्प होत असल्याने दुचाकीस्वार अन्य मार्गाने कोंडीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे या भागातील अरुंद गल्यांमध्येदेखील वाहतूक ठप्प होते. या भागात वास्तव्य व व्यवसाय करणे जिकरीचे झाल्याने नागरिकांचा रोष वाढतं आहे. प्रदूषणातदेखील भर पडली आहे.

त्यामुळे कोंडीतून मुक्तता करण्यासाठी ‘पवई आयआयटी’कडून सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणातून अंडरपास कमी करणे, सिग्नल यंत्रणा बसविणे, सर्कलचा घेर कमी करण्याचे पर्याय सुचविण्यात आले.

घेर कमी करण्याचा पर्याय सोपा

परंतु खर्चिक कामापेक्षा सर्कलचा घेर कमी करण्याचा पर्याय सोपा असल्याने महापालिकेकडून सध्या सर्कलचा घेर कमी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. द्वारका सर्कल परिसरातदेखील मुंबई नाक्याप्रमाणे स्थिती असल्याने त्या सर्कलचा घेर कमी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

महापालिकेकडून काम हाती घेतले जाणार आहे. परंतु द्वारका सर्कल भागात पिण्याच्या पाइपलाइन, मोबाईल, टेलिफोन केबलचे जाळे असल्याने राष्ट्रीय महामार्गाकडून परवानगी मिळत नाही. परंतु महापालिकेने द्वारका सर्कलचे काम हाती घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांनी दिली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IITM Pune News: दशकभराचा मॉन्सून अंदाज आता शक्य; पुण्यातील संशोधनाची मोठी झेप, ‘आयआयटीएम’ची नवी ‘प्रणाली’!

Mangalwedha Exam Centre:दाढी, मिशीमुळे संशय अन्‌ तोतया विद्यार्थ्यांचा भांडाफोड; केंद्र मंगळवेढ्यात विद्यार्थी बेळगाव, सांगली, कोल्हापूरचे!

Latest Marathi News Live Update : जोधपूरमध्ये लग्नाच्या दिवशीच दोन बहिणींचा मृत्यू; आत्महत्या केल्याचा संशय

Ladki Bahin Yojana : राज्यातील लाडक्या बहिणींची काळजी मिटणार ! एकनाथ शिंदेंची अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला 'ही' मोठी घोषणा

Dajipur Sanctuary Rain : फोंडा घाट, दाजीपूर अभयारण्य परिसरात जोरदार पाऊस; चंदगड तालुक्यालाही पावसाचा तडाखा

SCROLL FOR NEXT