mandhare.jpg 
नाशिक

जिल्हाधिकारी म्हणताएत...प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील यंत्रमाग सुरू करण्यास शासनाची परवानगी

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (मालेगाव) शासनाच्या अधिसूचनेनुसार प्रतिबंधित (कंटेन्मेंट झोन) क्षेत्राबाहेर शहरातील सर्व यंत्रमाग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. यंत्रमागधारकांनी सर्व खबरदारी व कामगारांच्या आरोग्याची काळजी घेत यंत्रमाग सुरू करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले. 

प्रशासन युद्धपातळीवर उपाययोजना

श्री. मांढरे म्हणाले, की यंत्रमाग अखंडितपणे व रोजगार नियमित सुरू राहील, यासाठी प्रयत्नशील राहावे. लॉकडाउनच्या काळात प्रशासन युद्धपातळीवर उपाययोजना राबवत आहे. रोजगाराअभावी नागरिकांवर उपासमारीची वेळ येऊ नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली. शहरातील 130 रेशन दुकानांमार्फत वितरण सुरू असून, विनारेशनकार्ड धारकांनाही मोफत तांदूळ वाटप झाले. शहरात धान्याचा तुटवडा व गुदामांची कमतरता नाही. धान्याची मागणी व वितरणाच्या सुयोग्य नियोजनामुळेच हे शक्‍य झाले. अपर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरचे प्रमुख डॉ. पंकज आशिया, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक सुनील कडासने, अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, अपर पोलिस अधीक्षक संदीप घुगे, प्रांताधिकारी विजयानंद शर्मा, महापालिकेचे उपायुक्त नितीन कापडणीस, तहसीलदार चंद्रजित राजपूत, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक प्रभाकर निकम, धान्य वितरण अधिकारी सुरेश थोरात आदी उपस्थित होते. 

कॉन्ट्रॅक्‍ट ट्रेसिंगवर भर द्यावा 

शहरातील व्यवसाय सुरळीत होण्यासाठी प्रशासनामार्फत सर्वतोपरी सहकार्य करावे. बॅंका, पेट्रोलपंप आदी व्यवसाय सुरळीत करावेत. तथापि, पॉझिटिव्ह रुग्णाचे कटाक्षाने ट्रेसिंग करावे. त्यासाठी सीडीआर रिपोर्टची मदत घेऊन सूक्ष्म पद्धतीने कॉन्ट्रॅक्‍ट ट्रेसिंग केल्यास कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मदत होईल. नागरिकांनी दैनंदिन व्यवहार सुरळीत ठेवण्यासाठी आरोग्य प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT