Dadasaheb Falke Memorial esakal
नाशिक

फाळके स्मारकाचा रामोजी फिल्म सिटीच्या धर्तीवर विकास होणार!

विक्रांत मते

नाशिक : नाशिकचे भूमिपुत्र व चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके (Dadasaheb Falake) यांच्या कार्याचा गौरव म्हणून महापालिकेने (NMC) उभारलेल्या फाळके स्मारकाला (Memorial) पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी जवळपास २५ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीच्या (Ramoji Film city) धर्तीवर हा विकास केला जाणार असून त्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी महापालिकेने स्वारस्य देकार मागविले. सल्ला देण्यासाठी दीड कोटी रुपये खर्च करण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे. (Phalke Memorial will be developed on model of Ramoji Film City Nashik News)

महापालिकेकडून पांडव लेण्यांच्या पायथ्याशी दादासाहेब फाळके स्मारकाची निर्मिती करण्यात आली आहे. फाळके स्मारक नाशिककरांचे महत्त्वाचे मनोरंजन केंद्र झाले होते. मात्र, स्मारकाच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामाबरोबरच वॉटर पार्क, रेस्टॉरंट व पार्किंग आदी कामे घेण्यासाठी नगरसेवकांमध्ये स्पर्धा सुरू झाल्यानंतर स्मारकाचा बट्ट्याबोळ उडण्यास सुरवात झाली. फाळके स्मारक म्हणजे महापालिकेसाठी हत्ती पोसण्यासारखे झाले. उत्पन्न दहा लाख, तर खर्च मात्र एक ते दीड कोटी रुपये येत असल्याने महापालिकेला परवडत नव्हते. त्यामुळे समस्या वाढून स्मारकाला अवकळा प्राप्त झाली. स्मारकाचा पुनर्विकास करण्याचा निर्णय सत्ताधारी भाजपच्या कारकिर्दीत घेण्यात आला.

तत्कालीन महापौर सतीश कुलकर्णी त्यासाठी आग्रही राहिले. सिनेदिग्दर्शक नितीन देसाई यांच्या एनडी स्टुडिओ संस्थेला तीस वर्षे मुदतीसाठी स्मारक देखभाल दुरुस्तीसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, लेखापरीक्षकांनी महापालिकेला मिळणाऱ्या रॉयल्टीवर हरकत घेतली. याच दरम्यान छगन भुजबळ यांनी महापालिकेला भेट दिली. त्या वेळी स्मारकाच्या खासगीकरणाला विरोध दाखविला परिणामी निविदा प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागला.

रामोजी फिल्म सिटीच्या धर्तीवर विकास

हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटीच्या धर्तीवर फाळके स्मारक विकसित केले जाणार आहे. पुनर्विकासासाठी जवळपास २५ कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. स्मारक पुनर्विकासाच्या कामाचे नियोजन व नियंत्रण करण्याबरोबरच स्मारकामध्ये कुठल्या बाबींचा समावेश असेल यासंदर्भात सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सल्लागार संस्था नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी महापालिकेने स्वारस्य देकार देखील मागविले, सल्लागाराला सल्ल्यापोटी जवळपास दीड कोटी रुपये मोजण्याची तयारी महापालिका प्रशासनाने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaghcha Raja Look: लालबागचा राजा २०२५ चा पहिला लूक समोर, प्रथम दर्शनातून दिसली पहिली झलक, पाहा व्हिडिओ

Rahul Gandhi: राहुल गांधींना किस केलं, सुरक्षा रक्षकानं तरुणाला पकडलं अन्...; बाईक रॅलीतील व्हिडिओ व्हायरल

AUS vs SA, ODI: दक्षिण आफ्रिकेचा वनडेतील सर्वात मोठा पराभव, तरी जिंकली ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका; पाहा काय झाले रेकॉर्ड

Latest Marathi News Updates : रस्त्याअभावी रखडली अंत्ययात्रा, पुरोगामी महाराष्ट्रात अंत्ययात्रेसाठी ट्रॅक्टरचा आधार

Nagpur Fraud;'बेटिंग ॲप’द्वारे किराणा व्यापाऱ्याची २६ लाखांची फसवणूक; सायबर पोलिसांकडून चौघांविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT