Adv. Nitin Thackeray news esakal
नाशिक

Nashik News: फार्मसी पदवीच्‍या प्रस्‍तावास मंजुरी; आयुर्वेद महाविद्यालयासाठी जागेचा शोध : ॲड. ठाकरे

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज संस्‍थेची जबाबदारी स्‍वीकारली तेव्‍हा कर्ज व देयके अशी एकूण १४० कोटींची देणी होती. अवघ्या चार महिन्‍यात पंधरा कोटी रुपयांपर्यंतची देयके कमी करण्यात कार्यकारिणीला यश आलेले आहे. आडगाव येथील प्रांगणात औषधनिर्माणशास्‍त्र शाखेतील पदवी महाविद्यालयाच्‍या प्रस्‍तावास मंजुरी मिळाली आहे.

संस्‍थेतर्फे आयुर्वेद महाविद्यालय सुरु केले जाणार असून, त्‍यासाठी जागेचा शोध सुरु आहे, अशी माहिती संस्‍थेचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे यांनी दिली. (Pharmacy degree proposal approved Search for site for Ayurveda College advocate nitin Thackeray Nashik News)

ॲड. ठाकरे म्‍हणाले, की आडगाव येथील शैक्षणिक संकुलात पदविका महाविद्यालयाला जोडून पदवी महाविद्यालय (बी.फार्मसी) सुरू करण्याचा प्रस्‍ताव मंजूर झालेला आहे. गंगापूर रोडवरील महाविद्यालयाची विद्यार्थी प्रवेश क्षमता पूर्वपदावर आणण्यात यश आलेले आहे. कृषी महाविद्यालयासंदर्भात समितीने नुकताच भेट देत पाहणी करत समाधान व्‍यक्‍त केले.

विनाअनुदानित तत्‍वावरून अनुदानितवर सेवकांना आणण्यासाठी विशेष प्रयत्‍न केले जात आहेत. सिन्नर येथील होरायझन स्‍कूलला सीबीएससीची संलग्‍नता प्राप्त करतांना गंगापूर रोडवरील होरायझनचाही संलग्‍नतेचा प्रश्‍न सोडविला आहे.

हेही वाचा : या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

संस्‍थेच्‍या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय रुग्‍णालयात दैनंदिन तपासणीसाठी येणाऱ्या रुग्‍णांमध्ये वाढ होऊन ही संख्या सातशेपर्यंत गेलेली आहे. दाखल रुग्‍णांच्‍या संख्येतही वाढ झालेली आहे.

आर्किटेक्‍चर महाविद्यालयास शरद पवारांचे नावाचा मार्ग मोकळा

संस्‍थेच्‍या आर्किटेक्‍चर महाविद्यालयाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव देण्याची घोषणा केलेली होती. परंतु कागदोपत्री नावात बदल झालेला नव्‍हता. या संदर्भात नामकरण शुल्‍क भरलेला नव्‍हता. हा शुल्‍क कार्यकारणीने भरला असून, आता कागदांवरही शरद पवार यांचे नाव लावण्याचा मार्ग मोकळा झाला असल्‍याचे ॲड. ठाकरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT