minor girl rape.jpg
minor girl rape.jpg 
नाशिक

अत्यंत घृणास्पद! मुलीची आई शेतमळ्यात गेली...अन् नराधम पित्याने मात्र..

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : स्वत:च्याच 16 वर्षीय मुलीवर अत्याचार केला. त्यामुळे गर्भवती राहून बाळाला जन्म देणाऱ्या पोटच्या मुलीलाच कुमारी माता बनविणाऱ्या नराधम बापाला जिल्हा न्यायालयाने जन्मठेप व 31 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. ही घटना 2015 मध्ये घडली होती. 

"तुझ्या आईला आणि भावंडांनाही मारून टाकीन'

आरोपी हा पत्नी व मुलीसह शेतमजुरी करण्यासाठी पांढुर्ली (ता. सिन्नर) शिवारात 2014 मध्ये आला होता. ऑक्‍टोबर 2015 मध्ये एके दिवशी पीडितेची आई शेतमळ्यात कामासाठी गेली असता खोपीमध्ये एकट्याच असलेल्या 16 वर्षीय स्वत:च्या मुलीवर आरोपीने तिच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत अत्याचार केला. पीडित मुलीने विरोध केला असता, तिला मारहाण करून "तुझ्या आईला आणि भावंडांनाही मारून टाकीन' अशी धमकी देत घटनेची वाच्यता न करण्याचीही धमकी दिली. त्यानंतरही नराधम बापाने वारंवार पोटच्या मुलीवर अत्याचार केला. यातून पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर घटनेचा उलगडा झाला. 2016 मध्ये पीडितेने जिल्हा रुग्णालयात मुलाला जन्म दिला. या प्रकरणी सिन्नर पोलिसांत पॉक्‍सोसह बलात्कार, मारहाणीचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. सहाय्यक पोलिस निरीक्षक आठवले यांनी तपास करीत जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. 

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधम बापाला जन्मठेप 

खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधा नायर यांच्यासमोर चालला. ऍड. रेवती कोतवाल यांनी सरकारी पक्षातर्फे कामकाज पाहिले. यात पीडिता आणि तिची आईची साक्ष, तसेच वैद्यकीय अहवाल महत्त्वाचा पुरावा ठरला. त्यानुसार न्यायाधीश सुधा नायर यांनी आरोपी नराधम बापाला जन्मठेप व 31 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा भोगावी लागेल. पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक निरीक्षक एन. ए. सय्यद, सहाय्यक उपनिरीक्षक आढाव, महिला पोलिस ज्योती उगले यांनी काम पाहिले. 

हेही वाचा > PHOTO : महिलांमधील रणरागिणी जिवंत झाली अन्‌ पुढे काय?  हल्लाबोल!​
डीएनए अहवाल ठरला निर्णायक 
आरोपी बापानेच पोटच्या मुलीवर बलात्कार करीत, तिला कुमारी माता होण्यास भाग पाडले. या प्रकरणी पीडितेने जन्म दिलेले बाळ आणि आरोपीची डीएनए चाचणी करण्यात आली होती. ही चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे न्यायालयासमोर स्पष्ट झाले. हाच अहवाल निकालासाठी निर्णायक ठरला.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT