ravindra supekar 1.png 
नाशिक

थक्क करणारा प्रवास! धडधाकटांनाही लाजवेल अशी दिव्यांगांची धडाडी...

दत्तात्रय ठोंबरे : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : दिव्यांगत्वावर मात करण्यासाठी बाळगलेली जिद्द अन्‌ पोटापाण्यासाठी नोकरी करण्याऐवजी रोजगारनिर्मितीच्या ध्यासातून वावी (ता. सिन्नर) येथील रवींद्र भाऊसाहेब सुपेकर यांनी एक वेगळा आदर्श समाजापुढे ठेवलाय. वार्षिक आठ लाखांची उलाढाल अन्‌ शेकडो महिलांना बचतगटांच्या माध्यमातून रोजगार मिळवून देणारे सुपेकर यांची ही धडाडी निश्‍चितच धडधाकट तरुणाईलाही लाजवेल, अशीच आहे. 

थक्क करणारा प्रवास...

वयाच्या पाचव्या वर्षी दोन्ही पाय व एक हात निकामी झाले. तरीही पुढे केवळ जिद्दीच्या जोरावर शिक्षण घेतले. नोकरी न करता क्‍लासेस सुरू केले. शैक्षणिक क्षेत्रात काम करताना मासिक पाळीमुळे मुलींचे शाळेतील प्रमाण कमी होत असल्याचे जाणवले. त्यातून "स्त्री स्वाभिमान' नावाचे युनिट सुरू करून दोन वर्षांत आदिवासी भागात दहा हजार मुलींना मोफत सॅनिटरी नॅपकिन वाटले. सध्या रोज सॅनिटरी नॅपकिनचे उत्पादन घेऊन पाचशे बचतगटांच्या माध्यमातून ते वितरित केले जातात. त्यामुळे बचतगटांनाही रोजगार मिळाला असून, या उद्योगातून वार्षिक आठ लाखांची उलाढाल होते. 
सुपेकर मूळचे नगर जिल्ह्यातील. शिक्षणासाठी ते वावीला आले. वयाच्या पाचव्या वर्षीच आजारपणात उपचार सुरू असताना त्यांचे दोन्ही पाय व डावा हात निकामी झाला. दोन-तीन वर्षे उपचार घेऊनही फरक पडला नाही. मग शिक्षणाला सुरवात केली. तेव्हापासून तीनचाकी खुर्चीवर प्रवास सुरू झाला. जिद्दीच्या जोरावर इंग्रजी व अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले. दरम्यानच्या काळात उदरनिर्वाहासाठी क्‍लासेस सुरू केले. सुरवातीपासूनची सामाजिक कामाची आवड मात्र स्वस्थ बसू देत नव्हती. आहे त्या परिस्थितीत आदिवासी भागात फिरत असताना मासिक पाळीमुळे मुलींचे शाळेतील उपस्थितीचे प्रमाण कमी असल्याचे सुपेकर यांनी हेरले अन्‌ यापुढे याच प्रश्‍नावर काम करायचे ठरवले. बॅंकेकडून मुद्रा योजनेतून कर्ज घेतले. "स्त्री स्वाभिमान' नावाने सॅनिटरी नॅपकिन बनविण्याचे युनिट सुरू केले. त्या माध्यमातून इगतपुरी, कळवणसह अन्य आदिवासी भागांतील दहा हजार विद्यार्थिनींना मोफत नॅपकिन उपलब्ध करून दिले.

तसेच, नियमित घेतल्या जाणाऱ्या उत्पादनाची विक्री पाचशे महिला बचतगटांच्या माध्यमातून केली जाते. या उद्योगातून वर्षाकाठी आठ लाखांची उलाढाल होते. या कार्याची दखल घेऊन त्यांना गेल्या वर्षी "राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कारा'ने सन्मानितही करण्यात आले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT