Garbage piles up in various places in the city, a pile of garbage piled up in Taklenagar area on Thursday
Garbage piles up in various places in the city, a pile of garbage piled up in Taklenagar area on Thursday esakal
नाशिक

Garbage Problem: पंचवटीच्या अनेक भागात कचऱ्याचे ढीग; पावसाळ्याच्या तोंडावर वाघाडी नाल्याची साफसफाई गरजेची

सकाळ वृत्तसेवा

Garbage Problem : स्वच्छ भारत अभियानाचा शहर स्वच्छतेबाबत डांगोरा पिटला जातो, परंतु प्रत्यक्षात मुख्य रस्ते, लोकप्रतिनिधींची कार्यालये, निवासस्थाने याकडेच अधिक लक्ष दिले जात आहे.

त्यामुळे मुख्य रस्ते चकाचक दिसत असलेतरी पंचवटीतील अनेक भागाकडे दुर्लक्ष झाल्याने कचऱ्याचे ढिगारे साचले आहे. (Piles of garbage in many parts of Panchvati before monsoon cleaning of Waghadi drain necessary Nashik)

पंचवटीतील नाग चौक, गणेशवाडी, जुना आडगाव नाका, दिंडोरी रोड, पेठ रोड भागातील मुख्य चौकासह अनेक भागात मोठ्या प्रमाणावर कचरा साचल्यावरच तो उचलला जातो, अशी स्थानिकांची तक्रार आहे.

नाग चौकातील नाग मंदिराकडून गणेशवाडी भागाकडे येणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जातो, या ठिकाणी महापालिकेतर्फे व्यावसायिक गाळेही उभारण्यात आलेले आहेत.

परंतु जवळचे असलेले सार्वजनिक स्वच्छतागृहे, नियमित घंटागाडी येऊनही त्यात कचरा न टाकता सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याची मानसिकता यामुळे मोठा खर्च करूनही व्यावसायिकांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे.

विशेष म्हणजे येथून जवळच आमदार राहुल ढिकले यांचे निवासस्थानही आहे. नाग चौकाकडून जुन्या आडगाव नाक्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरही मोठ्या प्रमाणावर उघड्यावर कचरा टाकला जातो. परंतु त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने रोजच कचरा टाकला जात असल्याचे चित्र आहे.

गणेशवाडीतील तीळेश्‍वर गणपती मंदिरासमोरून नाग चौकाकडे जाणाऱ्या पादचारी पुलाच्या अलीकडेही मोठ्या प्रमाणावर उघड्यावर कचरा टाकला जातो. या भागातही नियमित घंटागाडी येते. वाघाडी नाल्यातही मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जातो.

हाच कचरा पुढे गोदावरीच्या पात्रात मिसळतो. पावसाळ्याच्या तोंडावर वाघाडी नाल्याची साफसफाई गरजेची आहे, पण त्याकडेही दुर्लक्ष होत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

निर्माल्य कलशात कचरा

गाडगे महाराज पुलावरून गोदापात्रात मोठ्या प्रमाणावर निर्माल्य टाकण्यात येते. त्याला अटकाव बसावा म्हणून गाडगे महाराज पुलाच्या मध्यभागी निर्माल्य कलश बसविण्यात आला खरा.

परंतु या निर्माल्य कलशात निर्माल्य कमी व कचरा अधिक जमा होऊ लागल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. या ठिकाणी लिखित स्वरूपात आवाहन करूनही थेट दुचाकीवरूनच या कलशाकडे निर्माल्य व कचरा फेकला जातो, त्यातील निम्मा कलशात तर निम्मा रस्त्यावर पसरतो.

दिंडोरी, पेठ रोडवर तीच स्थिती

वणी दिंडोरीसह गुजरातकडे जाणारा जवळचा रस्ता म्हणून दिंडोरी व पेठ रोडवर राज्यासह परराज्यातील वाहनांची मोठी वर्दळ असते.

मात्र शहराच्या प्रवेशद्वाराजवळच म्हणजे पेठ व दिंडोरी रस्त्यावरील पाटाच्या कडेलाच थेट रस्त्यावर कचरा टाकला जातोय. या ठिकाणीही नियमित घंटागाड्या येऊनही रस्त्यावर कचरा टाकला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Mumbai Loksabha: वर्षा गायकवाडांना निवडणूक जाणार कठीण? या कारणामुळे नसीम खान नाराज

Goldy Brar: गोल्डी ब्रार जिवंत! कॅलिफोर्नियात मारलेली व्यक्ती दुसरीच; अमेरिकन पोलिसांचा खुलासा

Latest Marathi News Live Update : 10 नक्षलवाद्यांच्या मृतदेहांसह शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त

SCROLL FOR NEXT