Pipeline washed away by flood on Pimpalsond Road
Pipeline washed away by flood on Pimpalsond Road  eskal
नाशिक

Nashik Rain News : अतिवृष्टीमुळे पाईपची मोरी गेली वाहून; पिंपळसोंड गावाचा तालुक्याशी संपर्क खंडित

सकाळ वृत्तसेवा

Nashik Rain News : तालुक्यातील अतिदुर्गम डांग गुजरात सीमावर्ती भागातील पिंपळसोंड येथील अंबिकेची उपनदी भुतकुड्याचा ओहळवरील पाईपची मोरी गुरुवारी (ता.२८) मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या अतिवृष्टीमुळे पुरात वाहून गेली. पिंपळसोंड येथील नागरिकांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. (Pipeline washed away by flood on Pimpalsond Road nashik rain news)

या नाल्यांना तातापानी उंबरपाडा (पि) येथे रस्त्यावर पाईप टाकलेली अरुंद मोरी असून थोडा पाऊस झाला तरी डोंगरद-याचा तीव्र उतार असल्याने पाण्याचा लोंढा अचानक येतो. नेहमीच या मोरीवरुन पावसाचे पाणी वाहत असते. त्यामुळे अंबाठा, डोल्हारे, रानविहीर, खुंटविहीर या गावाकडे पिंपळसोंड येथील नागरीकांना जाता येत नाही.

जीव धोक्यात घालून नदी पार करावी लागते. प्रसूतीकरीता तालुक्याच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल होता येत नाही. रात्री, अपरात्री सर्पदंश, वन्यजीवांनी हल्ला केल्यास अथवा शेती कामात अपघात झाला तर कुठेही उपचारासाठी जाता येत नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अंबाठा ते पिंपळसोंड हा रस्ता खराब झाला असून डोल्हारे ते पिंपळसोंड या रस्त्यावर दांडीचीबारी, खुंटविहीर, मालगोंदा, उंबरपाडा (पि) या भागातील रस्त्यावर गुडघाभर चिखल व खड्डे पडले आहेत.

डांग जिल्हा सीमावर्ती महाराष्ट्र राज्यातील भाग हा सुरवातीपासून दुर्लक्षित राहिला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी आम्हाला गुजरात राज्याला जोडा अशी मागणी केली होती. त्यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांनी विविध विकास कामांचे आश्वासन दिले होते, मात्र एकही काम न होताच ते आश्वासन हवेतच विरल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. हा रस्ता तत्काळ दुरुस्ती करण्यात यावा. या ठिकाणी पुलाचे बांधकाम करावे अशी मागणी केली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Income: रिझर्व्ह बँकेने केली 2 लाख कोटींहून अधिक कमाई; RBI पैसे कसे कमावते?

Sanjay Raut: डमी मशीनवर मतदानाबाबत मार्गदर्शन, ठाकरेंचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; संजय राऊत आक्रमक!

Ebrahim Raisi: मौलवी कुटुंबात जन्म ते इराणचे अध्यक्ष, जाणून घ्या इब्राहिम रईसी यांची समलैंगिकतेपासून महिलांपर्यंतची मते

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा अधिकार

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

SCROLL FOR NEXT