pits  
नाशिक

'शासन दुर्घटना होण्याचीच वाट पाहतेय का?'...वाहनचालकांचा संतप्त सवाल!

सकाळवृत्तसेवा

नाशिक / नांदूरमध्यमेश्‍वर : गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात नदीवर असलेल्या पुलावरील रस्त्यावर पडलेले खड्डे दुसऱ्या पावसाळा आली तरी तशाच असल्याचे उदाहरण जिल्ह्यात असून या पुलावरून वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांनी याबाबती आपली तीव्र नाराजी दर्शवित आता शासन काय महाड येथे झालेल्या दुर्घटनेच्या पुनरावृत्तीची वाट पाहत आहे का ? अशी प्रतिक्रिया देत आहे. त्यामुळे "सरकारी काम सहा महिने थांब' असे म्हणणे ऐवजी वर्षभर थांब अशीच म्हणण्याची वेळ स्थानिकांवर आली आहे

पुलावरील खड्डे "जैसे थे'

निफाड- सिन्नर या दोन तालुक्‍यांना दळणवळणाच्या दृष्टीने जोडणाऱ्या नांदूरमध्यमेश्‍वरलगतच्या गोदावरी नदीवरील पुलावर गेल्या वर्षी पूरपाण्याने मार्गावरील स्लॅब ठिकठिकाणी उखडून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. दुसरा पावसाळा सुरू होऊनही आजही परिस्थिती "जैसी थे' असल्याने वाहनचालकांनी याप्रकारामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. निफाड- सिन्नर या दोन तालुक्‍यांना दळणवळणाच्या दृष्टीने एकमेकांना जोडणारा महत्त्वाचा व कमी अंतराचा रस्ता असल्याने रोज अनेक लहान, मोठी अवजड वाहने या पुलावरून ये-जा करत असतात. गेल्या वर्षी गोदावरीला आलेल्या पुरात हा पूल पाण्याखाली गेला होता. या पूरपाण्याने रहदारी मार्गावरील स्लॅब ठिकठिकाणी उखडून मोठमोठे खड्डे पडले आहेत. पाणी ओसरल्यानंतर पुलावरील रस्त्याची डागडुजी होईल, असे सर्वांना वाटत होते. मात्र एक वर्ष उलटूनही या पुलावरील खड्डे "जैसे थे' आहेत.

जीव मुठीत धरून प्रवास

सद्यःस्थितीत सुरत-वघई-सिन्नर राज्य क्रमांक 23 नावाने या रस्त्याच्या रुंदीकरणाचे व मजबुतीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. रस्त्यासाठी लागणारी खडी, मुरुम आदी साहित्याची वाहतूक या पुलावरून होत आहे. पण ठेकेदारालाही या खड्ड्यात मुरुम टाकायचा विसर पडला आहे. पुलावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांत पावसाचे पाणी साचत असून, वाहनचालक खड्डे चुकविण्याच्या नादात नागमोडी वाहने चालवत आहे. यातच पुलाला संरक्षक कठडे नसल्याने प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करण्याची वेळ आली आहे. 

नांदूरमध्यमेश्‍वर धरणातून एक लाख क्‍युसेस विसर्ग झाला, तर हा पूल पाण्याखाली जाऊन रस्त्यावरील वाहतूक ठप्प होते. दर वर्षी असे होत असेल, तर पूल बांधण्याचे प्रयोजन काय? जनतेच्या पैशाचा हा अपव्यय नाही का? असा सवाल केला जात आहे. - दशरथ शिंदे (रहिवासी, नांदूरमध्यमेश्‍वर) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT