नाशिक : जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या प्रतिदिन हजारावर पोचली असताना प्रशासकीय उणिवा विविध घटनांतून पुढे येत आहेत. बिटको रुग्णालयात व्हेंटिलेटर पडून असल्याचे प्रकरण ताजे असतानाच, जिल्हा रुग्णालयात
दोन महिन्यांपासून प्लाझ्मा मशिन पडून असल्याचे चित्र आहे. मृत्युदर आटोक्यात आणण्यात महत्त्वाचे प्लाझ्मा यंत्र लवकर सुरू करा म्हणून कार्यकर्त्यांवर आंदोलनाची वेळ आली आहे.
जिल्हा रुग्णालयातील प्रकार
कोरोनाचा प्रभाव जिल्ह्यात वाढत असताना प्रशासकीय यंत्रणेच्या उणिवा आणि निष्काळजीपणाचे उदाहरण पुढे येत आहे. आठवडाभरात महापालिकेच्या बिटको रुग्णालयात व्हेंटिलेटर पडून असल्याचे पुढे आले असताना सोमवारी जिल्हा रुग्णालयात चक्क प्लाझ्मा थेरेपीचे यंत्रच बंद असल्याचे उजेडात आले. दोन महिन्यांपूर्वी नाशिकचे मुख्यालय असलेल्या जिल्हा रुग्णालयात कोरोनावर उपचारासाठी प्लाझ्मा थेरेपीसाठी मशिन घेण्यात आले. कोरोनाच्या आजारातून बरे झाल्यानंतर अनेक प्लाझ्मा दाते तयार आहेत. मात्र नेमक्या अशा संघर्षाच्या काळातच मशिन बंद आहे. त्याचा वापरच होत नाही. त्यामुळे मृत्युदर आटोक्यात आणण्याची चर्चा घडत असताना मृत्युदराला अटकाव घालण्यात महत्त्वाचे ठरत असलेले प्लाझ्मा यंत्र पूर्ववत सुरू करावे म्हणून सामाजिक कार्यकर्त्यांवर आंदोलनाची वेळ आली आहे.
हेही वाचा > धक्कादायक! कोरोनाबाधित मृतदेह नातेवाईकांना काढून नेण्यास सांगितले; वैद्यकीय अधीक्षकांनी मागविला खुलासा
वैद्यकीय अधिकाऱ्यांना निवेदन
कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असताना स्वॅब दोन तासांत मिळावेत. जिल्हा रुग्णालयात परिचारिका, वॉर्डबॉयची पदे भरावीत. यासह इतरही उणिवांबाबत आज कम्युनिस्ट पक्षातर्फे वैद्यकीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
माजी नगरसेवक ॲड. तानाजी जायभावे, राजू देसले, निशिकांत पगारे, सीताराम ठोंबरे आदींनी निवेदन देत, प्लाझ्मा यंत्र पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली.
संपादन - रोहित कणसे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.