A farmer turning a plow over a damaged maize crop. esakal
नाशिक

संततधारेने करपल्याने 2 एकर मक्यावर फिरवला नांगर

सकाळ वृत्तसेवा

येवला (जि. नाशिक) : निसर्ग रुसला आणि कोपला तरी शेतकऱ्याचे नुकसान ठरलेले असते. दोन आठवड्यांहून अधिक काळ सतत ढगाळ हवामान आणि संततधारेमुळे ठाणगाव येथील शेतकऱ्यचा तब्बल दोन एकर मका शेतातच खराब झाला.

पूर्ण पीकच सडून करपा पडल्याने कुजले व पाने लालेलाल होऊन नापीक होण्याच्या स्थितीत गेल्याने या शेतकऱ्याने गुरुवारी (ता. ४) टोकाचे पाऊल उचलत दोन एकर मक्यावर रोटर फिरवला. (Plow turned by farmer on 2 acres of maize Latest marathi news)

सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मका पीक पूर्णपणे खराब झाल्याने अक्षरशः मका जनावरांनाही खाण्याच्या लायकीचा राहिला नसल्याने केलेला उत्पादन खर्चदेखील निघणे कठीण झाल्याने तालुक्यातील ठाणगाव येथील तरुण शेतकरी प्रवीण शेळके यांनी उभ्या मका पिकावर रोटर फिरवत पीकदेखील उपटून टाकले आहे.

शेळके यांनी दोन महिन्यांपूर्वीच मक्याची पेरणी केली होती. मात्र पीकवाढीच्या अवस्थेत असतानाच संततधारेमुळे मका पिकाचे पूर्णपणे मुळे खराब होऊन पाने पिवळी व लाल होऊन खराब झाल्याने मका पिकाचा चारादेखील होणार नसल्याने संतप्त होत शेळकेंनी आपल्या उभ्या दोन एकर मका पिकावर रोटर फिरवत मका पीक उपटून टाकले.

तालुक्यात मका पिकाचे क्षेत्र वाढत असून, हक्काचे उत्पन्न देणारे पीक असल्याने तब्बल ४० हजार हेक्टरवर मका पिकाची पेरणी झाली आहे. पावसामुळे पिकाला फटका बसलेला असल्याने शेतकरी फवारणी करून पीक वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र शेळके यांचा मका जरा जास्तच खराब झाला आहे.

त्यांना पेरणीपासून आतापर्यंत जवळपास ३० ते ३५ हजारांच्या आसपास खर्च आला होता. मात्र पीक खराब झाल्याने उत्पादन खर्चदेखील मुश्किल झाल्याने पिकावर रोटर फिरवून उपटून टाकण्याची वेळ या शेतकऱ्यावर आली आहे. हे पीक असेच खराब होऊन हंगाम वाया घालवण्यापेक्षा आता येथे दुसरे पीक घेण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे

"पाच एकरांपैकी दोन एकरात मका पीक घेतले होते. सुरवातीला पाऊस लांबला. नंतर संततधारेने मकाची मुळे खराब होऊन पाने लाल, पिवळी पडत पूर्णतः खराब झाली. मका चाऱ्याच्याही लायकीचा उरला नाही. शिवाय भविष्यातदेखील मकाचे असेच नुकसान होत राहिल्यास चाऱ्याचा प्रश्न भेडसावणार आहे. शासनाने या नुकसानीची पंचनामे करून भरपाई द्यावी." -प्रवीण शेळके, शेतकरी, ठाणगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 17 पहिल्यांदाच मिळतोय इतका स्वस्त; हजारो रुपयांचा डिस्काउंट, iPhone 16 अन् MacBook वरही जबरदस्त सूट..'इथे' सुरुय ऑफर

Nashik Municipal Election : नाशिकमध्ये भाजपला धक्का? शिवसेना-राष्ट्रवादीत ७०-५० चा फॉर्म्युला ठरला!

खाकी वर्दीला सलाम! दारुच्या नशेत पती गर्भवती पत्नीला नेत होता रुग्णालयात, पोलिसांनी अडवलं अन्... पाहा VIDEO

'आईवडील सतत भांडण करायचे' बिग बॉस फेम मालती चहरने सांगितला जुना किस्सा, म्हणाली..'मला मारायचे...'

Pune Municipal Elections: घड्याळासोबत जावं ही कार्यकर्त्यांची इच्छा, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार; रोहित पवारांनी केलं शिक्कामोर्तब

SCROLL FOR NEXT