PM Shri Yojana esakal
नाशिक

PM Shri Yojana : जिल्ह्यात 36 शाळांचा होणार कायापालट; उच्च दर्जाचे, गुणात्मक शिक्षणावर असणार भर

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : केंद्र व राज्य शासनातर्फे राज्यात राबविण्यात येणाऱ्या पीएमश्री शाळा योजनेसाठी नाशिक जिल्हयातील ९५० शाळांचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता, त्यातून प्राथमिक चाचणी होऊन अंतिम निवडीत ३६ शाळा पात्र ठरल्याची माहिती शिक्षणाधिकारी (प्रा) भगवान फुलारी यांनी दिली. (PM Shri Yojana 36 schools will transformed in district Emphasis will on high quality qualitative education nashik news)

राज्यात आदर्श शाळा उपक्रम राबविण्यात येत असून निवडलेल्या शाळांच्या सुविधेसाठी शासनाकडून एक कोटीपेक्षाही जास्त निधी देण्यात येत आहे. त्याच धर्तीवर राज्यात आता पीएमश्री शाळा योजनेची सुरुवात होत आहे.

या योजनेतही जिल्हयातील निवड झालेल्या शाळांच्या विकासाकरीता कोट्यवधी रुपयांचा निधी मिळणार आहे. राज्यातील ८४६ शाळांचा सर्वांगिण विकास करणाऱ्या पीएमश्री योजनेची अंमलबजावणीचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.

यानुसार आता योजनेचा प्रत्यक्षात विस्तार सुरू करण्यात येणार आहे. देशभरात पहिल्या टप्प्यात १५ हजारांहून अधिक शाळा उच्च दर्जाचे, गुणात्मक शिक्षण देणाऱ्या सर्वोत्कृष्ट शाळा म्हणून विकसित करण्यात येणार आहेत.

यात राज्यातील ८४६ शाळांचा समावेश आहे. पीएमश्री योजनेत केंद्राचा ६० टक्के हिस्सा असेल. यामध्ये जिल्हा परिषदेतंर्गत ३० शाळा, नाशिक महापलिकेंतर्गत ४ तर, मालेगाव महापालिका अंतर्गत दोन अशा एकूण ३६ शाळांची निवड झाली आहे.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

निवड झालेल्या जि.प. शाळा

लखमापूर नं- १, नवे रातीर (बागलाण), कानमंडाळे, मंगरूळ (चांदवड), पिंपळगाव, खालप (देवळा), महाजे, निळवंडी (दिंडोरी), सांजेगाव, साकूर (इगतपुरी), शिरसमणी, कातळगाव (कळवण), अजंग, कंक्राळे (मालेगाव), लोहशिंगवे, टाकळी बु (नांदगाव) गंगावऱ्हे, गिरणारे (नाशिक), सुभाषनगर, कारसूळ (निफाड), जळे, राजबारी (पेठ), शिवडे, गोंदे (सिन्नर), पळसण, गोपालपूर (सुरगाणा), बेझे, दलपतपूर (त्र्यंबकेश्वर), बदापूर, पिंपळगाव लेप (येवला), मनपा शाळा नं ३३, २८ (मालेगाव मनपा), शासकीय कन्या विद्यालय, मनपा शाळा नं २१, मनपा शाळा नं ७८, मनपा शाळा नं ८७ (नाशिक मनपा).

पावणेदोन कोटींची तरतूद

प्रत्येक शाळेसाठी एक कोटी ८८ लाख एवढी तरतूद पाच वर्षांसाठी करण्यात येईल. या शाळांसाठी पाच वर्षांकरीता केंद्राचा हिस्सा ९५५ कोटी ९८ लाख राहणार असून राज्याचा ४० टक्के हिस्सा प्रती शाळा ७५ लाख प्रमाणे ६३४ कोटी ५० लाख खर्च अपेक्षित आहे.

या योजनेतील दुसऱ्या टप्प्यात ४०८ गट, २८ महानगरपालिका आणि ३८३ नगरपालिका व नगरपरिषदा यामधून पीएमश्री शाळांची निवड करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Festival Toll Free: गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित! कोकण प्रवास भाविकांना टोल फ्री, पास मिळवण्याची प्रक्रिया काय? जाणून घ्या

Vijay Thalapathy News: विजय थलपतींनी २०२६च्या तामिळनाडू निवडणुकीबाबत केली मोठी घोषणा!

Maharashtra Latest News Update: माटुंगा पोलिसांच्या थरारक कारवाईत दरोड्यातील मुख्य आरोपी अटक

Rajgad News : वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका; ढोल ताशांच्या गजरात राजगडच्या मावळ्यांचा जल्लोष

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT