police action on criminal in ghoti nashik marathi news 
नाशिक

घोटीत दहशत असलेल्या सराईतची पोलिसांकडून वरात!

गोपाल शिंदे

नाशिक/घोटी : घोटी तालुक्याचे धार्मिक व व्यापारी पेठेचे प्रमुख ठिकाण आहे. शहरात या सराईत गुन्हेगाराची दहशत आहे, तसेच त्याच्यावर काही वर्षांपूर्वी पोलिसांवरदेखील हल्ले केल्याचे परजिल्ह्यात तसेच घोटी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. अनेक जिल्ह्यांतून तडीपार असलेला हा सराईत अल्पवयीन मुलांना जाळ्यात ओढून पैशाचे आमिष दाखवून गुन्हे घडवून आणत असल्याचे तपासात समोर आले आहे.

भर नागरी वस्तीत घरफोडी

घोटी शहरातील सराईत प्रमोद (पम्या) गंगाधर शिंदे (वय ४०) याचा घोटीत गुन्हेगारी फोफावण्यात त्याचा मोठा वाटा राहिला आहे. तसेच शहरात सराईत पम्याची मोठी दहशत होती. भावेश चांदमल भन्साळी यांच्या भर नागरी वस्तीत असलेल्या आनंद बंगला या राहत्या घराचे व दुकानेचे (ता. १८) च्या मध्यरात्री शटर तोडून सिगारेटची आठ लाख ७० हजार ३१५  रुपायांची घरफोडी झाली होती. त्यानंतर जिल्हा व परजिल्ह्यात मालाची विक्री केल्याचे देखील समोर आले होते. दरम्यान पोलिस निरीक्षक जालिंदर पळे, उपनिरीक्षक रोहित मोरे यांच्या पथकाने घटनेचा मागोवा घेत चार संशयितांना अटक केली. अशाच अनेक गुन्ह्यामध्ये सराईत पम्याचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. घोटी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर प्रमोद (पम्या) गंगाधर शिंदे (वय ४०) याची   बाजारातून वरात काढली.

बहुतांश माल हस्तगत

संशयित पम्याकडून गुन्ह्यातील बहुतांश माल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले असून, त्यांच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची पोलिसांना आशा आहे. इगतपुरी दिवाणी व फौजदारी न्यायालयाने त्याला पाच दिवसांचा पोलिस कोठडी दिली. गुन्ह्यातील रूपेश मनोहर बेलेकर (वय २८), सूरज शशिकांत अग्रवाल (३०), वैभव विनायक बोराडे (१८) यांना अटक करण्यात आली.  

संपादन - रोहित कणसे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : वेस्ट इंडिजने विक्रमांचा पाऊस पाडला, पण आपला कुलदीप यादव कमी नाही पडला; नोंदवला जबरदस्त पराक्रम...

Latest Marathi News Live Update : आदित्य ठाकरे आणि संजय राऊत ठाण्यातील पोलीस स्टेशनमध्ये दाखल

Mohol Agriculture: अप्रोल मिळाला तरी पीक नोंद गायब! सॉफ्टवेअरच्या अडचणीने मोहोळच्या शेतकऱ्यांची कर्जासाठी धावपळ

Nitin Gadkari Ethanol News : ई-२० नंतर आता शंभर टक्के इथेनॉलवर धावणाऱ्या वाहनांवर भर; नितीन गडकरींची मोठी घोषणा

कीर्तनातून प्रसिद्ध झालेल्या तरुणीची भन्नाट गोष्ट; ‘पाच फुटाचा बच्चन’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता

SCROLL FOR NEXT