night ghat 1.jpg 
नाशिक

मध्यरात्रीची वेळ..सामसुम घाटात कोणीही नसताना चांगली संधी साधली...पण गेमच फसला!

हंसराज भोये

नाशिक/ जांबूळपाडा : मध्यरात्रीच्या सुमारास घाटात अनेक अशा घटना घडत असतात. केशव धूम हे रविवारी रात्री सैन्यात असलेला चुलत भाऊ दिनेश याची सुट्टी संपल्याने दोघांसह त्याला कारने) मुंबई विमानतळावर सोडण्याकरिता निघाले होते. पण त्यावेळीच अशी एक घटना घडली. ज्याने साऱ्यांनाच घाम फुटला.

असा घडला प्रकार

  सुरगाणा तालुक्यातील अलंगुण येथील केशव धूम हे रविवारी रात्री सैन्यात असलेला चुलत भाऊ दिनेश याची सुट्टी संपल्याने दोघांसह त्याला कारने (एमएच१५ जीएल ८६७६) मुंबई विमानतळावर सोडण्याकरिता निघाले होते. यावेळी रात्रीच्या सुमारास ते पळसन-पळशेतमार्गे देवळा शिवारातून नाशिककडे येत असतांना करली घाटात खेड (ता. सुरगाणा) येथील सागर बोरसे आणि त्याच्या इतर तिघा साथीदारांनी घाटातून जाणाऱ्यांना लुटण्याच्या इराद्याने करवली नाल्याजवळ आपल्या मोटारसायकल (एमएच १५ सीजी ७९८६) आडवी लावली. अन् मग...

ज्याला लुटायला गेला त्यानेच ओळखले

 याचवेळी संशयितांनी धूम यांची गाडी थांबवित त्यांना आपल्याजवळील धारधार शस्त्राने धाक दाखविला. मात्र याचवेळी केशव धूम यांनी संशयित सागर यास ओळखले. ओळखीच्या माणसाला अडवून लुटण्यास निघालो. आता आपण पकडले जाणार या भितीने चौघांनी हत्यारे जागेवरच टाकून मोटारसायकलवर धूम ठोकली. त्यानंतर केशव धूम यांनी मुंबईवरून येताच पोलिस ठाणे गाठले आणि संशयित सागर विरूद्ध तक्रार केली. पोलिसांनी देखील परिस्थितीचे गांभीर्य ओळखत तत्काळ संशयित सागर आणि त्याच्या साथीदारांना पकडले. न्यायालयाने या सर्वांना सात दिवसांची पोलिस कोठडी देखील सुनावली. 

चोरट्यांनी गावाकडे पळ

 सुरगाणा (जि.नाशिक) येथील करली घाटात असाच प्रकार घडला. धारधार शस्त्रांचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न देखील झाला. मात्र ज्याला लुटायचे त्यांनेच चोरट्यास ओळखले. आपण पकडलो गेलो यातून हत्यारे तिथेच टाकून चोरट्यांनी गावाकडे पळ काढला.

संपादन - ज्योती देवरे


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Delay Maharashtra : आधी 11, मग 15 अन् आता थेट...; महाराष्ट्रात 'या' तारखेला मान्सून सक्रिय होणार! हवामान खात्याचा नवा अंदाज, यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस?

TMC कुणाची? बंडखोर पक्षाच्या नावासह चिन्हावर दावा करणार; शिवसेना, राष्ट्रवादीच्या वाटेवर ममतांचा पक्ष

Latest Marathi News Live Update : धुळेकरांचे मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाच्या कामाची 50 वर्षांचे स्वप्न पूर्णत्वाकडे

IND A vs SL A: दुष्काळात तेरावा महिना! विपराज निगमच्या चुकीचा फटका; भारताच्या धावा ICCने कमी केल्या, नेमकं काय घडलं?

EPF Insurance: PF खातेदारांना मिळतो तब्बल 7 लाखांचा मोफत विमा; अनेकांना याची माहितीच नाही; जाणून घ्या पात्रता आणि नियम

SCROLL FOR NEXT