Areested esakal
नाशिक

गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोघांना अटक

कुणाल संत

नाशिक : अवैध गावठी कट्टा व जिवंत काडतूस बाळगणाऱ्या दोघा संशयितांना गुन्हे शाखा युनिट एक आणि नाशिक रोड पोलिस ठाण्याच्या पथकाने अटक केली व त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले. पोलिसांनी दोघांकडून एक-एक गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस जप्त केले.

म्हसरूळ परिसरात असलेल्या पवार लॉन्सजवळ एकाकडे एक गावठी कट्टा असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट एकचे अंमलदार विशाल देवरे यांना मिळाली. त्यांनी वरिष्ठांना ही माहिती देत पवार लॉन्स परिसरात सापळा रचला. त्यावेळी संशयित कृष्णा मधुकर जाधव (वय २३, रा. धात्रक फाटा) यास अडवून विचारपूस व त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस, असा ३० हजार ५०० रुपयांचा मुद्देमा लजप्त केला.

दुसरी घटना पिंपळपट्टी रोडवर घडली. नाशिक रोड पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे अंमलदार विशाल कुंवर यांना पिंपळपट्टी रोड परिसरात एक संशयित पिस्तूल घेऊन फिरत असल्याचे समजले. त्यावरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने सापळा रचून संशयित अमोल प्रल्हाद लहाणे (वय २२, रा. पिंपळपट्टी रोड, जेल रोड) यास पकडण्याचा प्रयत्न केला असता, त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यास पकडून त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडील दुचाकीत (एमएच १५, इयू २९२२) दुचाकीत गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी दुचाकीसह शस्त्र, असा एकूण ८० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivdeep Lande contest Bihar Election: ‘सिंघम’ शिवदीप लांडे यांचीही आता बिहारच्या निवडणूक रिंगणात उडी; उमेदवारी अर्ज दाखल करणार!

EPFO New Option : 'ईपीएफओ' सदस्यांना मिळाला नवा पर्याय! आता 'PF' रक्कम पेन्शन खात्यात वळवता येणार

ब्रेकिंग! साहेबांच्या नावाने लाच मागणारा एजंट ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात; मयताच्या भावाकडे, पत्नीकडे पीएफ, पेन्शन काढून देण्यासाठी मागितले २५००० रुपये

Ajit Pawar : जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी करण्याचे उपमुख्यमंत्री पवार यांचे आदेश

Supreme Court : मृत्युदंडाच्या पद्धतीवर सर्वोच्च न्यायालयाची केंद्रावर नाराजी

SCROLL FOR NEXT