Police Commissioner sandip karnik in Action Mode combing operation across city Arrest of refugees  esakal
नाशिक

Nashik Police: पोलीस आयुक्त 'ऍक्शन मोड'मध्ये! शहरभर कोंबिंग ऑपरेशन; टवाळखोरांची धरपकड

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : अवघ्या चार दिवसांपूर्वी पोलीस आयुक्त पद स्वीकारलेले नवनियुक्त पोलीस आयुक्त संदीप कर्णिक अखेर ॲक्शन मोडवर आले आहेत.

शहरात सलग दोन दिवस दोन खून झाल्यानंतर पोलीस आयुक्तांनी आज मंगळवारी (ता 28) रात्री अचानक कोंबिंग ऑपरेशन राबवत टवाळखोरांसह रेकॉर्डवरील गुन्हेगारांची धरपकड केली यामुळे शहरातील गुन्हेगारांचे धाबे दणाणल आहे. (Police Commissioner sandip karnik in Action Mode combing operation across city Arrest of criminals nashik)

नवनियुक्त पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गेल्या शुक्रवारी आयुक्तपदी रुजू झाले. आयुक्त रुजू होऊन दोन दिवस होत नाही तोच रविवारी रात्री अंबड हद्दीमध्ये अल्पवयीन मुलाचा खून करण्यात आला तर सोमवारी संध्याकाळी म्हसरूळ हद्दीमध्ये सेवानिवृत्त सैनिकाचा खून करण्यात आल्याची घटना घडली.

खुनाच्या दोन घटना एकापाठोपाठ घडल्याने नवीन पोलीस आयुक्त कर्णिक यांच्यासमोर एक प्रकारे गुन्हेगारांचे उभे ठाकले.

त्यामुळे आयुक्त कर्णिक यांनी मंगळवारी दुपारी पोलीस उपायुक्तांसह पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेत गुन्हेगारी विरोधात धडक कारवाईचे आदेश देत, रात्री 7 ते 11 वाजेपर्यंत कोंबिंग ऑपरेशन राबविले.

पोलीस ताफा रस्त्यावर

चार पोलीस उपायुक्त, सात सहायक आयुक्त, 30 पोलीस निरीक्षक, 125 सहायक निरीक्षक-उपनिरीक्षक यांच्यासह 1150 पोलीस अंमलदार आजच्या कोंबिंग ऑपरेशनमध्ये सहभागी झाले होते.

13 पोलीस ठाण्याअंतर्गत रेकॉर्ड वरील गुन्हेगारांसह टवाळखोरांना लक्ष्य करण्यात आले. यावेळी टवाळखोरांना ताब्यात घेत त्यांची फोटोसह नोंदी घेण्यात आल्या. पोलिसांच्या या कारवाईमुळे गुन्हेगारांसह टवाळखोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Latest Marathi News Live Update : जसप्रीत बुमराहला मागे टाकत मिचेल स्टार्क कसोटी क्रमवारीत अव्वल

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

SCROLL FOR NEXT