police nashik.jpg 
नाशिक

''पोलिस आयुक्त साहेब..पीएफच्या फाईलवर सही करा नाहीतर आत्महत्या'' पोलिस कर्मचाऱ्याने थेट कंट्रोललाच सांगितली आपबिती

सतीश निकुंभ

नाशिक / सातपूर : मुलीच लग्न जमलं आहे.. पोलिस आयुक्त साहेब.. पीएफच्या फाईलवर सही करा अन्यथा आत्महत्या करावी लागेल असा हाताश झालेल्या एका कर्मचाऱ्याने कंट्रोलला फोन लावल्याचा प्रकार समोर आला आहे.

पोलीस कर्मचारीही हतबल

कोरोनाच्या काळात आनेकांचे आर्थिक परिस्थिती खालावली आहे त्यात शाळा काॅलेजचे अॅडमीशन.मुलांचे विवाह आई वडील पत्नीचे आजारपण या सह विविध समस्या सर्व सामान्य नागरिकांप्रमाणे पोलीस कर्मचाऱ्यांनाही आहेत. त्यासाठी गेल्या तीन चार महिन्यांपासून शेकडो कर्मचाऱ्यांनी आयुक्त कार्यालयात आपला पीएफ मिळावा यासाठी अर्ज दाखल केला आहे.

 पोलिसांची अपेक्षा 

मुलीच लग्न जमलं आहे.. पोलिस आयुक्त साहेब.. पीएफच्या फाईलवर सही करा अन्यथा आत्महत्या करावी लागेल असा हाताश झालेल्या एका कर्मचाऱ्याने कंट्रोलला फोन लावल्याचा प्रकार समोर आला आहे. निदान वरीष्ठ आता तरी कर्मचारीच्या समस्या बाबत लक्ष देतील अशी अपेक्षा पोलिस कर्मचारी व्यक्त करत आहेत

थेट कंट्रोललाच लावला फोन

पण गेल्या तीन महिन्यांपासून या कर्मचाऱ्याच्या फाईल संबंधित विभागाचे कर्मचारी वरिष्ठाच्या सहीसाठी ठेवत नसल्याने कर्मचारी हातबल झाले आहेत. यातील एका कर्मचाऱ्याने थेट कंट्रोललाच फोन करून मुलीच लग्न जमले आहे त्यासाठी पीएफ मिळावा म्हणून फाईल टाकली आहे. पण अडीच महिने झाले. फाईलवर वरिष्ठाची सही झाली नसल्याने पीएफ मिळाला नाही. त्यामुळे पीएफ मला मिळाला नाही तर मी पोलिस आयुक्तालयासमोर आत्महत्या करेन असा फोन केला. यावरून वरिष्ठांनी लक्ष घालून निदान पोलिस कर्मचाऱ्यांना आपला हक्काचा पैसा तरी मिळेल अशी आपेक्षा व्यक्त केली जात आहे.

खात्यात मात्र वेगळा न्याय

पीएफ कार्यालय ऑनलाईनच्या कितीही गप्पा मारत आसले तरी पोलिस खात्याचा कारभारा बाबत मात्र आपला हात आखडता घेते. त्यामुळे इतर खाजगी कंपन्याच्या कर्मचारीना आपला हक्काचा पीएफ काढतांना ऑनलाईन अर्ज केला तर 48 तासात खात्यावर पैसे जमा होतात. पण पोलिस खात्यात मात्र वेगळा न्याय आहे. हे धोरण बदलण्याची गरज निर्माण झाली आहे. 

संपादन - ज्योती देवरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sainik Takli Protest : आमदार यड्रावकरांच्या समर्थकांकडून सैनिक टाकळीच्या आंदोलकांना मारहाण?, शिरोळ तालुका बंदची हाक; तिरंग्याच्या काठीने मारल्याला आरोप

Panvel-Karjat Railway Line: कर्जतहून नवी मुंबई आता आणखी जवळ! नवा रेल्वेमार्ग लवकरच खुला होणार; किती टक्के काम पूर्ण?

Koyna Dam: कोयना धरणाच्या दरवाजातून होणार विसर्ग पुर्णपणे बंद; धरणात सध्या 93.02 टीएमसी पाणीसाठा

Yavatmal Politics: जमिनीवर बसले, काळा चहा घेतला, झुनका-भाकरी खाल्ली; पालकमंत्री संजय राठोडांचा आदिवासी बांधवांसोबत दिवस

Religious Travel: ६ महिने स्केटिंग, ३ महिने सायकलिंग! श्रद्धेला जिद्दीची साथ; बाराही ज्योतिर्लिंगांसाठी निघालेल्या दोन तरुणांची अनोखी कहाणी

SCROLL FOR NEXT