नाशिक : इंदिरानगरच्या मैदानावर खुलेआम विनापरवाना वाळूची विक्री होत असून, याप्रकरणी नऊ विक्रेत्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. मुळात परवानगी नसताना चोरटी वाळूविक्री होते कशी, याबाबत महसूल प्रशासन मात्र दुर्लक्ष करत आहे. याप्रकारात नऊ ट्रकमधील प्रत्येकी दीड ब्रास वाळू जप्त केली. police file charges against nine people for selling unlicensed sand
राजीवनगर परिसरातील ग्रॅंड रियो हॉटेल परिसरातील मोकळ्या मैदानावर विनापरवाना चोरून आणलेली सुमारे नऊ ट्रक वाळू प्रकरणी तलाठी संजय कापडणीस यांच्या तक्रारीवरून नऊ जणांविरोधात इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. दत्ता त्र्यंबक डोके (वडाळागाव), सोपान फकीरा गोटाळ (राजीवनगर), शेषराव तुळशीराम धनसावंत (लेखानगर), राजाराम दशरथ साने (विल्होळी), अधीमभाई शेख (पाथर्डी गाव), राजू चव्हाण (बोधलेनगर), रामकृष्ण दगू कोठुळे (इंदिरानगर), अंकुश साहेबराव मोहतमल (पाथर्डी), शिवाजी वसंत वाघमारे (शिवाजी चौक, सिडको) अशी संशयितांची नावे आहेत.
तलाठी संजय कापडणीस यांच्या तक्रारीनुसार, १६ जुलैला सातच्या सुमारास हॉटेल ग्रॅड रियो हॉटेलजवळील मोकळ्या जागेत (एमएच १५ बीजे ५६३७), (एमएच १५ जी ७६७०), (एमएच १४ एफ ७४९७),(एमएच ०४ बीजे ४३०९), (एमडब्ल्यूएन ०५६७), (एमडब्ल्यूव्ही ५४५७), (एमएच ०४ सीपी २१७२), (एमएच १५ व्हीजे २७३६), (एमएच १५ जी ७६३१) या नऊ ट्रकमध्ये प्रत्येकी दीड ब्रास वाळू मोकळ्या मैदानात विक्रीसाठी आणली होती. वाळू विक्रीबाबत त्यांच्याकडे विक्री परवाना नसताना चोरून आणल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.