Jitendra Bhave Sakal
नाशिक

लूट करणाऱ्यांना मोकळीक तर दाद मागणाऱ्यांवर गुन्हे - जितेंद्र भावे

विनोद बेदरकर

नाशिक : रुग्णांना नागवून अनामत रक्कम परत मिळण्यासाठी आम आदमी पक्षातर्फे (APP) करण्यात आलेल्या अर्धनग्न अवस्थेतील आंदोलनाबाबत मुंबई नाका पोलिसांनी जितेंद्र भावे (Jitendra Bhave) यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. दरम्यान, पोलिसांची कृती ही चोर सोडून संन्याशाला फाशी असल्याचा आरोप आम आदमी पक्षातर्फे करण्यात आला. (police has taken action against Jitendra Bhave regarding the agitation in the hospital)

व्होक्हार्ट रुग्णालयात रुग्णांची अनामत रक्कम परत मिळण्याबाबत आम आदमी पक्षातर्फे काल 'कपडे काढो' आंदोलन करण्यात आले. या आंदोलनानंतर पोलिसांनी भावे यांना सात तास ताब्यात घेतले. त्याविषयी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे, राज्य प्रवक्ते जितेंद्र भावे यांनी आज पत्रकार परिषद घेउन त्यांच्यावरील पोलिस कारवाईचा निषेध केला.

भावे म्हणाले की, रुग्णालयांनी अनामत रकमा घेउ नये असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे पत्रकार परिषदा घेउन सांगत असतांना नाशिकला व्होक्हार्ट रुग्णालयांने घेतलेली अनामत रक्कम परत मिळावे यासाठी आम आदमी पक्षातर्फे रुग्णालयाशी संर्पक साधला रुग्णांकडून १० लाखांचे बिल आकारुन झाल्यांनंतर पून्हा अनामत रक्कम देत नसल्याने त्याविरोधात आम्ही दाद मागायला गेल्यावर आमच्या स्वताच्या अंगावरील कपडे काढून प्रतिनिधीक स्वरुपात रुग्णांच्या नागावलेपणाचे प्रतीकात्मक स्थिती दर्शविणारे आंदोलन केले असतांना पोलिसांनी अनामत रकमा घेणाऱ्या रुग्णालयाऐवज आमच्यावर कारवाई करीत, सात तास पोलिस ठाण्यात बसवून ठेवले. लूट करुन अन्याय करणाऱ्यांना मोकळीक तर न्याय मागणाऱ्यांवर गुन्हे ही पोलिसांची भूमिका सामान्यांवर अन्याय करणारी आहे. याप्रकरणी पोलिसांनी १८८ कलमानुसार प्रमाणे सार्वजनिक ठिकाणी आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.


आंदोलकांवर गुन्हे

दरम्यान मुंबई नाका पोलिसांनी भावे यांना ताब्यात घेतले असतांना, त्यांच्या सुटकेसाठी मुंबई नाका पोलिस ठाण्याबाहेर गर्दी जमवून आंदोलन केल्याप्रकरणी पोलिसांनी आम आमदी पक्षाचे दिनानाथ चौधरी, योगेश कापसे, विनायक येवले, सागर कुलकर्णी, संदीप शिरसाठ, समर राय, रविंद्र धनक, भाग्यश्री दधेल, हेमंत दधेल, शशीकांत चौधरी, प्रिया कोठावदे, सोमनाथ कुऱ्हाडे, राम वाघ, शुभम खैरनार, अक्षदा घोडके आदीविरोधात गैरकायद्याची मंडळी जमवून आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.



रुग्णालयाच्या लूटीविरोधात संर्घष कायमच

सर्वसामान्यांना आरोग्य-शिक्षणाचा हक्क मिळालाच पाहिजे. तो सामन्यांचा हक्क आहे. पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात आरोग्यवर अवघा ३ टक्के तरतूद आहे. अपुऱ्या सरकारी व्यवस्थेमुळे लोकांचे जीव जात असून सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी यापुढेही आम आदमी पक्षाचे आंदोलन सुरुच राहणार आहे.
- धनंजय शिंदे (राज्य सचिव आम आदमी पक्ष)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Bharat Train Food : ‘वंदे भारत रेल्वे’त प्रवाशांना आता स्थानिक पदार्थ दिले जाणार ; रेल्वेमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

Messi and Revanth Reddy Football Video : लिओनेल मेस्सीने हैदराबादेत मुख्यमंत्री रेवंत रेड्डींसोबत खेळला फुटबॉल; हजारो चाहत्यांचा उत्साह शिगेला!

PMC Retired Employees : निवृत्तीनंतर दिलासा; २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना पुन्हा मोफत वैद्यकीय उपचार!

Pune Health : कर्करोग निदानासाठी पुणेकरांना मोठा दिलासा; महापालिकेचे पेट स्कॅन सेंटर सुरू; खासगी रुग्णालयांपेक्षा निम्म्या खर्चात!

Soybean MSP : आधारभूत किमत खरेदीत शेतकऱ्यांवर अन्याय नको; आमदार डॉ. संजय कुटे यांनी अधिवेशनात मांडली ठाम भूमिका!

SCROLL FOR NEXT