psi dudhal.jpg 
नाशिक

पोलिस निरीक्षकाच्या नावाने पाठविली फ्रेंड रिक्वेस्ट; पत्रकाराने केला धक्कादायक खुलासा

दिपक घायाळ

नाशिक / विंचूर : शिरसाठ यांना दुधाळ यांच्या फेसबुकवरून फ्रेंड रिक्वेस्ट आली असता त्यांनी ती स्वीकारली. त्यानंतर मॅसेंजरद्वारे शिरसाठ यांना ‘मी अडचणीत आहे, मदत करा’, असा हिंदी भाषेतून संदेश पाठविला. त्यानंतर धक्कादायक खुलासा झाला,

असा घडला प्रकार

मुंबई येथील टिळकनगर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या नावाने एका भामट्याने बनावट फेसबुक अकाउंट उघडून दुधाळ यांच्या मित्र परिवारास फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून पैशांची मागणी केली. असाच अनुभव येथील विंचूरचे पत्रकार शिरसाठ यांना आला. शिरसाठ यांना दुधाळ यांच्या फेसबुकवरून फ्रेंड रिक्वेस्ट आली असता त्यांनी ती स्वीकारली. त्यानंतर भामट्याने मॅसेजरद्वारे शिरसाठ यांना ‘मी अडचणीत आहे, मदत करा’, असा हिंदी भाषेतून संदेश पाठविला. या वेळी श्री. शिरसाठ यांना हिंदीतून मॅसेज आल्याने संशय येताच त्यांनी श्री. दुधाळ यांना संपर्क करत सर्व माहिती देताच श्री. दुधाळ यांनी हे खोटे अकाउंट असल्याचे शिरसाठ यांना सांगत तत्काळ सायबर क्राइम विभागाशी संपर्क साधून संबंधित बनावट अकाउंट लाॅक करत मित्रांची होणारी आर्थिक फसवणूक टाळली.  

पोलिस अधिकाऱ्याचे फेसबुकवर खोटे अकाउंट

मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेल्या पोलिस अधिकाऱ्याचे फेसबुकवर खोटे अकाउंट उघडून त्यांच्या मित्रांकडे पैशांची मागणी केल्याचा प्रकार विंचूर येथे उघडकीस आला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं उच्चांकापासून 26 हजारांनी स्वस्त! पाहा ताजा भाव; पुढे सणासुदीच्या काळात सोनं महागणार की स्वस्त होणार?

पत्नीच्या खून प्रकरणी पती-सासऱ्यासह ८ जण तुरुंगात गेले, १२ वर्षांनी जिवंत सापडली महिला

MPSC Exam Success Story : शेतकरी बापाची लेक अन् आई पोलिसात! जाधववाडीच्या निकिताची MPSC मध्ये गगनभरारी, महसूल सहाय्यकपदी निवड

Marathi News Live Updates : कोकणवासियांचा खोळंबा! मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा, प्रचंड वाहतूक कोंडी

Caste Validity Certificate : जातवैधता प्रमाणपत्राचा आग्रह न धरता तात्पुरता प्रवेश द्या; उच्च न्यायालयाकडून अंतरिम दिलासा

SCROLL FOR NEXT