cyber Crime
cyber Crime esakal
नाशिक

Nashik Cyber Crime : Dating Appचा पासवर्ड मिळविण्याच्या नादात पोलिस अधिकाऱ्याला 2 लाखाचा गंडा

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : डेटिंग अॅपचे लॉग- इन पासवर्ड मिळविण्याच्या प्रयत्नात सहायक पोलिस निरीक्षकाला अज्ञात सायबर भामट्याने तब्बल दोन लाखांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात आयटी अॅक्टअन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Police officer extorted Rs 2 lakh to get password of dating app Nashik Cyber ​​Crime news)

पोलिस आयुक्तालयात कार्यरत असलेले सहायक पोलिस निरीक्षकाने मोबाईलमध्ये एक डेटिंग ॲप इन्स्टॉल केले होते. सदर अॅप अनइन्स्टॉल झाल्याने त्यांनी पुन्हा लॉग इन व पासवर्ड मिळविण्याचा प्रयत्न केला असता, त्यात अपयश आल्याने त्यांनी गुगल सर्चची मदत घेत कस्टमर केअरचा नंबर मिळविला.

संबंधितांशी संपर्क केल्यावर त्यांना गेल्या २६ फेब्रुवारीला सायंकाळी साडेसहा ते सव्वा नऊ या दरम्यान इंटरनेटच्या माध्यमातून अज्ञात संशयिताने ८९१०६७४९२९ व ९३३७०३८८४९ या मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधला. सदर अधिकाऱ्याला अॅपचे लॉग- इन करून देण्याच्या बहाण्याने त्यांना मोबाईलमध्ये एनी डेस्क नावाचे अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले.

हे अॅप डाऊनलोड केल्यावर संशयितांनी ५ रुपये शुल्क भरावयास सांगितले. ५ रुपये भरल्यानंतर, एनी डेस्क अॅपच्या माध्यमातून बँक खात्यातील माहिती भामट्यांनी अधिकाऱ्याच्या मोबाईलमधून घेतली. सर्वच अॅक्सेस मिळाल्याने भामट्याने या अधिकाऱ्याच्या बँक खात्यातून तीन तासांत दोन लाख रुपये दुसऱ्या खात्यांत वर्ग केले.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

दरम्यान, बँक खाते रिकामे झाल्याचा मेसेज अधिकाऱ्याला मिळताच धक्का बसला. त्याने नाशिक शहर सायबर पोलिस ठाणे गाठून फसवणुकीची फिर्याद देत गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास वरिष्ठ निरीक्षक सूरज बिजली करीत आहेत.

‘एनी डेक्स’ ॲप धोकादायक

ऑनलाइन आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी गुगल सर्च इंजिनच्या माध्यमातून कोणताही कस्टमर केअर नंबर शोधू नये. त्यापेक्षा संबंधित कंपनीच्या अधिकृत लेटरहेड, पोस्ट कार्ड, वा बिल किंवा हार्ड कॉपीवरून संपर्क नंबर मिळवावा.

तसेच कोणत्याही परिस्थितीत एनी डेस्क हे अॅप डाऊनलोड करू नये. हे ॲप डाऊनलोड केल्याने फसवणुकीचा धोका वाढतो, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT