Seized hookah Stuff
Seized hookah Stuff esakal
नाशिक

जुने नाशिक : हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा

- युनूस शेख

जुने नाशिक : हॉटेल शांतीदत्त इनच्या सहाव्या मजल्यावर सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर (Hookah Parlor) मध्यवर्ती गुन्हे शाखा पथक आणि भद्रकाली पोलिसांनी छापा मारून चौघांसह दोघांना ताब्यात घेतले आहे. मंगळवारी (ता. ३१) पहाटे ही कारवाई करण्यात आली. हॉटेल शांतीदत्त इनच्या सातव्या मजल्यावर हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आँचल मुदगल यांना मिळाली. त्यांनी उपनिरीक्षक गायकर, सहाय्यक उपनिरीक्षक माळी, कडनोर, बांगर, सुहास शिरसागर, किशोर देसले, शेरखान पठाण, नारायण सोनवणे, रामकृष्ण वाघ, यांना कारवाईच्या सूचना केल्या. (Police raid hookah parlor Old Nashik Nashik News)

त्यांनी घटनास्थळी दाखल होत माहिती घेतली. खात्री होताच भद्रकाली पोलिस ठाण्यात संपर्क साधत माहिती दिली. त्यानुसार उपनिरीक्षक जितेंद्र माळी यांच्यासह कर्मचाऱ्यांच्या मदतीने पथकाने कारवाई केली. अमोल जैन, यश भंडारी, पियुष कोठारे, रैनीत शहा असे चौघे हुक्का ओढताना पोलिसांना मिळून आले. पथकाने संपूर्ण हुक्का पार्लरची तपासणी केली. हुक्का ओढण्यासाठी लागणारे विविध साहित्य त्याच पद्धतीने तंबाखूजन्य पदार्थ असा सुमारे ३७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

शिवाय पार्लर चालक जय कैलास गजरा (३२, रा. मुंबई) तसेच सहकारी अलमोद्दिन युसुफअली (२९, रा. हॉटेल शांतीदत्त इन) अशा दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. पहाटे कारवाई पूर्ण करत भद्रकाली पोलिस ठाण्यात संशयित गजरा आणि अलमोद्दिन यांच्याविरुद्ध पोलिस शिपाई युवराज कानमहाले यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. राजकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तीच्या मालकीच्या हॉटेलमध्ये अशा प्रकारचा बेकायदेशीर व्यवसाय सुरू असल्याने पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे नागरिकांमध्ये चर्चेस उधाण आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

नववधूने तब्येत ठीक नसल्याचं सांगत अंगाला स्पर्श करु दिला नाही, दहाव्या दिवशी दाखवले रंग!

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला उडणार सोने खरेदीला झुंबड, पण सोनं खरं की भेसळयुक्त असं करा चेक!

Lok Sabha Election : नाशिकमधून मोठी बातमी! शांतिगिरी महाराजांचा अर्ज बाद पण...; दिंडोरीमधूनही 5 अर्ज बाद

Adhyayan Suman : बेरोजगारी आणि आलेलं नैराश्य; हिरामंडीतील अभिनेता म्हणाला,"व्यसनाच्या आहारी जाणार होतो पण..."

SCROLL FOR NEXT