Police searched for nylon manja in Old Nashik area nashik marathi news 
नाशिक

अखेर पोलिसांना जाग आली! जुने नाशिक परिसरात नायलॉन मांजाचा शोध 

युनूस शेख

जुने नाशिक : मकर संक्रातीच्या सणाच्या  काही दिवस आगोदर बाजारात पतंग आणि त्यासाठी लागणार मांजा विक्रीसाठी येतो. यात पक्षी आणि नागरिकांसाठी  धोकादायक असलेला नायलॉन मांजावर बंदी असताना देखील सर्रास विक्री केली जाते. 

सोमवारी  दुचाकीवर जात असलेल्या हिरावाडी येथील भारती जाधव या महिलेचा नायलॉन मांजाने गळा चिरुन मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर भद्रकाली पोलिसांनी सोमवारी (ता.२८) रात्री जुने नाशिक परिसरातील पतंग विक्री दुकानांची तपासणी केली. तसेच दुकानदारांना काही सूचना करण्यात आल्या. 

 मांजाने गळा कापल्याने मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या धक्कादायक घटनेनंतर लगेचच पोलिसांना जाग आली. जुने नाशिकमधील विविध भागातील दुकानाची तपासणी मोहीम राबविली.

सर्रास विक्री 

नायलॉन मांजा विक्रीस बंदी आहे. तरीही बाजारात सर्रास विक्री होत आहे.  अनेक दुकानदार मांजा न ठेवता त्यांची चोरी-छुपी विक्री करतात. तर काही ऑनकॉल मांजा विक्री करत आहे. या घटनेनंतर विक्रेते सतर्क झाले. त्यांनी दुकानातील नायलॉन मांजा पोलिस येण्यापूर्वीच दुकानातून हलविला. त्यामुळे पोलिसांना रिकाम्या हाती परतावे लागले. पोलिसांनी दुकानांमध्ये जागृती करत नायलॉन मांजी विक्री होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना विक्रेत्यांना केल्या. अन्यथा संबंधितांवर गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा दिला.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Farmer Loan Waiver 2026 : : जळगावच्या 45 हजार शेतकऱ्यांचे नशीब फळफळणार! सरकारने मागवली माहिती; शेतकरी कर्ज निवारण योजनेचा असा होणार फायदा!

Pune Accident: पिकअप व बोलोरोच्या धडकेत एक ठार, 9 गंभीर जखमी; अहिल्यानगर-कल्याण महामार्गावरील घटना, अंधारात काय घडलं!

Kagal Check Post Accidents: कागलमध्ये नाक्यावर अपघातांची मालिका, चेक पोस्ट व्यवस्थापनाचे दुर्लक्ष; बॅरिकेडस्‌मुळेच अनेक अपघात

Mumbai Local : मध्य रेल्वेचा पुन्हा खोळंबा, विक्रोळीजवळ तांत्रिक बिघाड; लोकल ३० ते ४० मिनिटं उशिरा, स्थानकांमध्ये गर्दी

South Africa vs West Indies: दक्षिण आफ्रिका वेस्ट विंडीज लढत भारतासाठीही महत्त्वाची; उपांत्य फेरीच्या दृष्टीने महत्त्वाचा सामना

SCROLL FOR NEXT