crime23.jpg 
नाशिक

पोलिसांची गाडी पाहून 'त्यांना' पळता भुई थोडी! अतिउत्साहीपणा चांगलाच भोवला; वाचा काय घडले?

संतोष विंचू

नाशिक : (येवला) कोरोनाची भीती व बंदी झुगारून शेकडो अतिउत्साही पर्यटक थेट देवदरी येथे फिरायला गेले. निसर्गाच्या सानिध्यात मस्त मज्जा घेत असतांना जेव्हा पोलिसांची झाली एन्ट्री...पोलिस गाडी पाहून त्यांना  पळता भुई थोडी..! वाचा काय घडले मग...  

पोलिसांकडून ३३ जणांवर कारवाई 

लॉकडाऊनमध्ये घरात बसून वैतागलेले नागरिक निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी येथे यायचे पण ही हौस त्यांना चांगलीच भोवली. पोलिसां ची अचानक आलेली गाडी पाहून पर्यटकांची पळता भुई थोडी झाली. डोंगर - दऱ्याचा वारसा अन् पावसाने वनविभागाच्या जंगलाच्या सानिध्यात फुललेल्या देवदरी येथे सिद्धेश्वर महादेवाचे मंदिर असून खोलवर दरी, चौफेर हिरवळ, त्यातच वाहणारा छोटासा धबधबा अशा निसर्गसंपन्न वातावरणात वेगळा आनंद पर्यटक इथे घेतात. धबधबा, पाणी, हिरवळ अन् डबा पार्टी असे एकदिवसीय पर्यटनाचा आनंद नागरिक घेतात. मोठ्या पर्यटनस्थळी जाणे शक्य नसल्याने मागील महिन्याभरापासून येथील गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. नागरीक घरात बसून वैतागले असल्याने छोटेखानी का होईना पण पर्यटन करू या हेतूने येथे येवल्यासह वैजापूर, कोपरगाव, सिन्नर, नांदगाव, निफाड आदी तालुक्यातून गर्दी वाढल्याने स्थानिकांतून देखील कोरोनाची भीती व्यक्त होत होती. वाहने अन चार तालुक्यातील हजाराच्यावर पर्यटकांची होणारी प्रचंड गर्दीमुळे कोरोनाच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर तालुका पोलिसांनी देवदरी येथे सिद्धेश्वर देवस्थानी पर्यटनासाठी आलेल्या ३३ जणांवर कारवाई केली.

पर्यटकांचे धाबे दणाणले 

यापूर्वीदेखील पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली होती तसेच येथे आलेल्या युवकांना उठाबश्या काढण्याची शिक्षा देखील यापूर्वी पोलिसांनी केली आहे.
 मात्र येणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने तालुका पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंग राजपूत, उगले, सुराशे, हवालदार रघु सोनवणे, सांगळे आदींनी अचानक या ठिकाणी जाऊन पर्यटकांवर कारवाई केली. यामध्ये सहा जणांवर जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे गुन्हे दाखल झाले. साडेपाच हजार रुपये दंडही वाहनचालकांकडून वसूल करण्यात आला. एकूण लोकांवर कारवाई केल्याने आता पर्यटकांचे धाबे दणाणले आहे. 

तर पोलिस कारवाई केली जाईल

१५ पर्यंत बंद कोरोनाची रुग्णसंख्या ग्रामीण भागात वाढत आहे. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाच्या वतीने येथील सिद्धेश्वर देवस्थान व पर्यटन स्थळ १५ सप्टेंबरपर्यंत पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय झाला. या नियमाचे उल्लंघन केले तर पोलिस कारवाई केली जाईल असा इशारा पोलिस निरीक्षक अनिल भवारी, उज्वलसिंग राजपूत यांनी दिला आहे.

संपादन - किशोरी वाघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-Israel War: होर्मुजच्या समुद्रधुनीत भारत इराणविरुद्ध युद्धनौका तैनात करणार? ट्रम्प यांच्या आवाहनावर परराष्ट्र मंत्रालयाने दिलं उत्तर

Pune News: सुरक्षारक्षकाच्‍या सतर्कतेमुळे युवती सुखरूप परतली घरी; युवती रात्रभर अंधारात, अन् खडकवासला धरण परिसरात काय घडलं!

Pune Pollution: प्रदूषण रोखण्याची घोषणा हवेतच! पुणे महापालिकेला बांधकाम प्रकल्पांवर सेन्सर बसविण्याचा विसर, धूलिकणांचा आरोग्यावर गंभीर परिणाम..

Javali politics: जावळीच्या राजकारणात शिवेंद्रसिंहराजेच'धुरंधर'; दोन्ही पदांवर भाजपचाच झेंडा, राष्ट्रवादीच्या शिल्पा शिंदे तटस्थ!

Latest Marathi Update: DRDO घनसावंगी तहसील कार्यालयाच्या पथकांची कारवाई

SCROLL FOR NEXT