police suspend.jpg 
नाशिक

लॉकडाऊनमध्ये पोलीसच नशेत तर्रार अन् गाडी स्पीडमध्ये...बघता बघता गाडी थेट पोलीस हवालदारावरच!

सकाळ वृत्तसेवा

नाशिकरोड : सोमवारी ता. रात्री बिटको चौकात बंदोबस्तसाठी असलेल्या पोलीस हवलादार शेख यांच्या अंगावर नशेत चारचाकी चालवणाऱ्या नाशिक ग्रामीण पोलीस नाईकाने गाडी घालण्याचा प्रयत्न केला. याबाबत नाशिकरोड पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

गाडी थांबविण्यासाठी हाताने इशारा दिला, पण थांबली नाही
पोलीस हवालदार अल्लाउद्दीन लतिफ शेख, यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले की, सोमवारी रात्री डयुटीवर असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊत, भातुडे, पो. कॉ. शिंदे, कुहाडे, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त बिटको चौक येथे डयुटीवर होते. दरम्यान आडगाव येथे नाकाबंदी दरम्यान टाटा कंपनीची नेक्सान चारचाकी गाडी नंबर एम एच 14 जी.वाय 8018 ही थांबवली असता न थांबता तेथून बॅरीकेट तोडून पळून गेली आहे. ही गाडी पुन्हा जेलरोड मार्गी बिटको चौककडे भरधाव वेगाने येत थांबविण्यासाठी हाताने इशारा दिला, पण थांबली नाही पण अंगावर नेत जिवाला धोका होईल असे केले. ती पुढे नाशिकरोड स्टेशन दिशेने जात गाडी वेग कमी झाला यावेळी उपनगर बीट मार्शल व नाशिकरोड पोलिसांनी गाडी पकडून ताब्यात घेतली गाडी चालकास चौकशी केली असता पोलीस नाईक अभिनव अरुण नाईक, पिपळगांव महामार्ग नाशिक ग्रामीण, अशी माहिती दिली. त्याचा तोंडाचा वास येत होता. त्याच्यासोबत रमेश अय्यर, प्रविण पांडव, चंद्रकांत रायकर हे होते. हा मद्यपान करुन गाडी चालवित असल्याचे आढळल्याने पोलीस नाईक अभिनव नाईक यांच्यावर गुन्हा दाखल केला.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : अशोक खरातला भेटलेल्यांची HIV टेस्ट करा, नाहीतर...; विजय वडेट्टीवारांचा इशारा

Jalgaon Cotton Production : जळगावचा कापूस हंगाम संपुष्टात! 'सीसीआय'ची खरेदी बंद, निम्म्यावरच अडकले कापूस गाठींचे उत्पादन

Manchar Accident : मंचरजवळ एकलहरे येथे भीषण अपघात! पिंपरी-चिंचवडचे वास्तुविशारद आंबेगावे पती-पत्नी व सासूचा मृत्यू, दोन मुले गंभीर जखमी

Latest Marathi News Live Update : जळगावच्या पिंपळगाव हरेश्वर ते जरंडी रस्त्यासाठी शेतकऱ्यांचे आमरण उपोषणाचा तिसरा दिवस

ग्राहक पैसे पूर्ण देतात, तर वापर न झालेला डेटा मध्यरात्रीच का रिसेट करता? टेलिकॉम कंपन्यांना राघव चड्ढांचा प्रश्न, ही डिजीटल लूट

SCROLL FOR NEXT