Polkhol yatra in the state against agricultural reform laws nashik marathi news 
नाशिक

कृषी सुधारणा कायद्याविरोधात राज्यात पोलखोल यात्रा; शेतकऱ्यांमध्ये करणार जनजागृती

विनोद बेदरकर

नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघातर्फे केंद्र शासनाच्या प्रस्तावित कृषी सुधारणा कायद्यांना विरोध व राज्यातील शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्रात ६ ते 20 जानेवारी दरम्यान पोल-खोल यात्रा काढण्यात येणार आहे. अशी माहिती राष्ट्रीय किसान महासंघाचे राज्यातील समन्वयक संदीप गिड्डे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात 40 दिवस सहभागी झाल्यानंतर राष्ट्रीय किसान महासंघाचे महाराष्ट्रातील कार्यकर्ते राज्यात परतले आहेत. केंद्र सरकारच्या कृषी सुधारणा कायद्यांमधील त्रुटी व व धोके शेतकऱ्यांना सांगण्यासाठी व या कायद्यांना महाराष्ट्रातूनही विरोधासाठी हे कार्यकर्ते राज्यभरात फिरून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणार आहेत. नाशिकला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा सभागृहात त्यांनी बैठक घेतली. प्रदेशाध्यक्ष शंकर दरेकर, उपाध्यक्ष लक्ष्मण वनगे, एस. पी. पाटील, योगेश रायते, श्रीकांत तरळ, पद्माकर मोराडे आदी उपस्थित होते. 

कृषी कायदा शेतकऱ्याला मारक 

बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शंकर दरेकर म्हणाले, नव्या कायद्यामुळे मोठमोठे उद्योजक शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा धोका अधिक आहे. करार शेतीत शेतकऱ्याची फसवणूक झाल्यानंतर त्याला उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी लागेल. न्यायालयात जाण्याची कायद्यात तरतूद नाही. यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळण्याची शक्यता कमी आहे. तसेच एकटा दुकटा शेतकरी बहुराष्ट्रीय कंपन्यांशी करार करताना त्याची फसवणूकीची शक्यता अधिक असल्याने आम्हाला हे नवीन कायदे मान्य नाहीत. करार शेतीमुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगले दर मिळणार नसल्याचाही दावा त्यांनी केला. 

दर पद्धत चुकीची 

लक्ष्मण धोंडगे (लातूर) म्हणाले, दिल्लीतील आंदोलकांची मुख्य मागणी एमएसपी (किमान आधारभूत किंमत) कायदा लागू करावा ही आहे. सध्याचे एमएसपी दर चुकीच्या पद्धतीने काढले जातात. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांकडील औजारे, यंत्रे यांचा घसारा व जमिनीची किंमत गृहीत धरून काढलेल्या दराने किमान आधारभूत किंमत निश्चित केल्यास शेतकऱ्यांच्या मालास दुप्पट भाव मिळू शकतो, असा दावा त्यांनी केला.एस पी पाटील यांनी भूमिका मांडली. 

पोलखोल यात्रा 

संदीप गिड्डे यांनी दिल्ली येथे 40 दिवसांच्या आंदोलनानंतर आता प्रत्येक राज्यात शेतकऱ्यांकडे जाऊन त्यांना या कायद्यांचे धोके समजावून सांगण्यात येणार आहेत. यासाठी 6 जानेवारीपासून मुंबई येथून पोल-खोल यात्रा काढण्यात येणार आहे या यात्रेसाठी राष्ट्रीय किसान महासंघाचे राष्ट्रीय नेते उपस्थित राहतील ही यात्रा 20 जानेवारीपर्यंत राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत जाऊन जाऊन शेतकऱ्यांमध्ये जागृती करणार आहे. अभिनेत्री कंगना रानावत हिने शेतकरी आंदोलनाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. यामुळे तिच्या आगामी चित्रपटांवर शेतकऱ्यांनी बहिष्कार घालावा असेही आवाहन केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Price Crash: सोनं 3200 तर चांदी 3800 रुपयांनी स्वस्त; भाव आणखी किती घसरणार?

Harshwardhan Sapkal : एवढा खोटारडा पंतप्रधान देशाने यापूर्वी कधीही पाहिला नाही...!

Latest Marathi News Live Update : धाराशिव- तुळजापूर -सोलापूर रेल्वे मार्गाला 3295 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता

Horoscope Prediction : दिग्गज कलाकाराचा मृत्यू ते ट्रम्पची सत्ता धोक्यात ! 2026 साठी ज्योतिषाची महत्त्वाची भविष्यवाणी

Ladki Bahin Yojana : लाखो महिलांना मोठा दिलासा! 'लाडकी बहीण' योजनेतील ई-केवायसीला तात्पुरती स्थगिती; सप्टेंबर, ऑक्टोबरचे हप्ते खात्यात जमा होणार

SCROLL FOR NEXT