Bytco Hospital 
नाशिक

‘बिटको’त पुढील वर्षापासून पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम ; ५६ डॉक्टर उपलब्ध होणार 

विक्रांत मते

नाशिक : महापालिकेच्या नाशिक रोड येथील बिटको रुग्णालयात वैद्यकीय पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू केला जाणार असून, त्यासाठी मुंबईच्या सीपीएस महाविद्यालयाने सहकार्याची तयारी दर्शविली आहे. पहिल्या टप्प्यात १२ पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू केले जाणार असून, या माध्यमातून महापालिकेच्या रुग्णालयात ५६ शिकाऊ डॉक्टर उपलब्ध होतील. 

कोरोनामुळे बिटको रुग्णालयाचे खासगीकरण करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केला होता; परंतु गरिबांसाठी असलेल्या या रुग्णालयाचे खासगीकरण झाल्यास मूळ उद्देश साध्य होणार नसल्याने आयुक्त कैलास जाधव यांनी खासगीकरणाचा प्रस्ताव फेटाळत पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. यापूर्वीही असाच प्रस्ताव सादर करण्यात आला होता; परंतु महापालिकेकडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची क्षमता नसल्याने आरोग्य विज्ञान विद्यापीठाने प्रस्ताव फेटाळला होता. त्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेत पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरूही झाला. कोरोनासंसर्गाने उच्च पातळी गाठल्यानंतर महापालिकेच्या रुग्णालयांत डॉक्टरांची कमतरता भासू लागल्याने पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यामागे एक कारण ठरले. अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या पथकाने मुंबईतील रुग्णालये व कॉलेज ऑफ फिजिशियन्स व सर्जनला भेट दिली. त्यानंतर बिटको रुग्णालयाचे सर्वेक्षण करून अहवाल तयार करण्यासाठी महापालिकेकडे नऊ लाख रुपये शुल्काची मागणी करण्यात आली. महापालिकेकडून शुल्क अदा केले जाणार असून, पथक पुढील आठवड्यात बिटको रुग्णालयाला भेट देणार आहे. 

शिकाऊ विद्यार्थ्यांना मानधन 

अभ्यासक्रम सुरू झाल्यास महापालिकेला ५६ शिकाऊ स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, सर्जिकल, ऑर्थो, कान-नाक-घसातज्ज्ञ, रेडिओलॉजी, त्वचारोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ या आजारांवर अभ्यास करणारे डॉक्टर उपलब्ध होतील. दोन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी महापालिकेकडून शिकाऊ विद्यार्थ्यांना मासिक २० हजार रुपये मानधन अदा केले जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT