nashik muncipal corporation
nashik muncipal corporation Google
नाशिक

तयारी तिसऱ्या लाटेची : वैद्यकीय विभागात सहाशे पदे भरणार

विक्रांत मते

पहिल्या व दुसऱ्या कोरोना लाटेचा सामना करणाऱ्या महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला शासनाने अत्यावश्‍यक पदे भरण्यास मंजुरी दिल्याने दिलासा मिळाला आहे.

नाशिक : पहिल्या व दुसऱ्या कोरोना (Coronavirus) लाटेचा सामना करणाऱ्या महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला शासनाने अत्यावश्‍यक पदे भरण्यास मंजुरी दिल्याने दिलासा मिळाला आहे. त्यानुसार जूनपासून वैद्यकीय विभागातील डॉक्टर्स, नर्सेससह विविध सहाशे पदे भरण्याची प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. (posts in the medical department of nashik municipal corporation will be filled in june)

नाशिक महापालिकेत अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात विविध संवर्गातील पदे रिक्त आहेत. जुन्या ‘क’ वर्ग आकृतिबंधानुसार ७०९० पदे मंजूर करण्यात आली होती. त्यातील दोन हजार आठशे पदे सध्या रिक्त असून, उर्वरित ४८०० पदांवर काम करताना कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात कामाचा ताण निर्माण झाला आहे. शहराची वाढती लोकसंख्या गृहीत धरून महापालिकेच्या प्रशासन विभागाने नवीन आकृतिबंध राज्य शासनाकडे सादर केला आहे. त्यामध्ये एकूण चौदा हजार पदे आहेत. परंतु, अद्यापही शासनाने या आकृतिबंधाला मंजुरी दिली नाही.

कोरोना पहिला लाटेचा सामना करताना आरोग्य व वैद्यकीय सेवेवर मोठा ताण निर्माण झाला. त्यामुळे महापालिकेने अत्यावश्यक सेवेतील पदे भरण्याची मागणी केली होती. शासनाने त्यावेळीदेखील कायमस्वरूपी पदे भरण्याऐवजी मानधनावर पदे भरण्यास मान्यता दिली. त्यानुसार वैद्यकीय अधिकारी, स्टाफ, नर्सेस, वॉर्डबॉय, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, रेडिओलॉजिस्ट, अशा विविध पदांसाठी मानधनावर उमेदवारांच्या नियुक्‍त्या करण्यात आल्या. मात्र, वैद्यकीय विभागाची ही तात्पुरती गरज भागली. दीड महिन्यापूर्वी राज्य शासनाने वैद्यकीय व अग्निशमन विभागातील पदे भरण्यास मंजुरी दिली. त्यानुसार तिसऱ्या लाटेचा विचार करताना महापालिकेने मानधनावर पदे भरण्याऐवजी आता शासनाने दिलेल्या मंजुरीनुसार थेट नियुक्ती करण्यासाठी पावले उचलली आहेत. नव्या आकृतिबंधातील वैद्यकीय विभागाच्या एकूण ६०० रिक्त जागा भरल्या जाणार असल्याची माहिती देण्यात आली.

कोरोना तिसरी लाट लक्षात घेऊन वैद्यकीय विभागातील पदे तातडीने भरणे गरजेचे आहे. त्यानुसार वैद्यकीय विभागातील जवळपास सहाशे पदे भरण्याची प्रक्रिया जून महिन्यापासून सुरु केली जाणार आहे.

- कैलास जाधव, आयुक्त, महापालिका.

(posts in the medical department of nashik municipal corporation will be filled in june)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : तिथं जा नाश्ता वगैरे करा अन्... उद्धव ठाकरेंच्या भेटीपूर्वी अमित शाहांना फडणवीस काय म्हणाले होते?

Indian Economy: भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी आनंदाची बातमी! UNने 2024 साठी जीडीपी वाढीचा अंदाज वाढवला

Jalgaon News : दूषित पाण्याच्या नमुन्यांमध्ये लक्षणीय घट; डेंग्यूबाबत आरोग्य यंत्रणेच्या उपाययोजनांना यश

Latest Marathi News Live Update : धक्कादायक! पुण्यात कोयत्याने सपासप करुन तरुणाचा टोळक्याकडून खून

परदेशात पळून गेलेला खासदार भारतात आलाच नाही; आता 'रेड कॉर्नर नोटीस' बजावणे हाच एकमेव मार्ग शिल्लक!

SCROLL FOR NEXT