NMC Nashik news esakal
नाशिक

मिरवणूक मार्गावरील खड्डे नाहीसे; NMC बांधकाम विभागाकडून दावा

विक्रांत मते

नाशिक : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंडळे व नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून पावसाने पडलेल्या रस्त्यांवर विशेष करून मिरवणुकीच्या मार्गावरील खड्डे बुजविण्यात आल्याचा दावा मंगळवारी (ता. ३०) महापालिका बांधकाम विभागाकडून करण्यात आला. (potholes on procession route disappeared Claim from NMC Construction Department Nashik Latest Marathi News)

मंगळवारी पश्चिम विभागात त्र्यंबक रोड शरणपूर पोलिस चौकी येथे रस्त्यावरील खड्डे डांबर मटेरिअलने बुजविण्यात आले आहेत. याच विभागात सर्कल ते सिटी सेंटर मॉल चौक, उंटवाडी रोडवरील खड्डे भरण्यात आले आहेत. राका लॉन येथे रस्त्याच्या लगतचा गाळ आणि गवत काढून स्वच्छता करण्यात आली.

कॉलेज रोड, कॅनडा कॉर्नर येथे खराब झालेले चेंबरची चौकट आणि झाकण बदलण्यात आले. पूर्व विभागात अनेक ठिकाणी खड्डे बुजविण्यात आले. पाथर्डी रोड प्रभाग २३, पाथर्डी फाटा प्रभाग ३१, तपोवन रोड प्रभाग १५, टाकळी रोड प्रभाग १६, राजीवनगर रोड प्रभाग ३० मध्ये खडी, डांबराचा वापर करून खड्डे बुजविण्यात आले.

तसेच प्रभाग २३ मध्ये साईनाथनगर चौक आणि कॅनल रोडवर ग्रेडर मशिनच्या साहाय्याने साइड पट्टीची लेव्हल आणि स्वच्छता करण्यात आली. प्रभाग २४ मिलिंद नगर ते आरडी सर्कल दरम्यानच्या मार्गावरील खड्डे बुजविण्यात आले आहेत. नाशिक रोड विभागात नाशिक- पुणे मार्गावर स्लीप आणि सर्व्हिस रोडवर बीएमएम मटेरिअलने खड्डे बुजविण्यात आले आहेत.

बांधकाम विभागाकडून बहुतांश ठिकाणी खड्डे बुजविण्यात आले आहेत. महापालिकेच्या सहा विभागात बांधकाम विभागाकडून रस्ते दुरुस्तीच्या कामांना प्राधान्य दिले जात आहे. नागरिकांच्या तक्रारीची त्वरित दखल घेतली जात आहे. रस्ता दुरुस्तीच्या कामांचा योग्य दर्जा असावा, असे निर्देश आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी बांधकाम विभागाला दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यात पुढील ५ दिवस हवामान बिघडणार! पुणे, नागपूरसह अनेक जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी; विभागाकडून सतर्कतेचं आवाहन

Pakistan Blast: पाकिस्तान पुन्हा हादरलं! शांतता रॅलीत भीषण स्फोट; १४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी, नेमकं काय घडलं?

प्रश्न कमी, परीक्षा आता एकाच शिफ्टमध्ये; NEET PG 2026 चे नवे नियम जाहीर, 'या' 5 गोष्टी जाणून घ्या...

FDA थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करते? तुकाराम मुंढेंनी कारवाईमागचं नेमकं कारणच सांगितलं! जाणून घ्या कायदा...

Gangaapur Accident: गंगापूर फाट्याजवळ उभ्या ट्रकला आयशरची जोरदार धडक; २५ वर्षीय चालक गणी शेख जागीच ठार

SCROLL FOR NEXT