potholes on the famous winery street from govardhan to gangavarhe in nashik potholes on the famous winery street from govardhan to gangavarhe in nashik
नाशिक

रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते? नाशिकच्या ‘वायनरी स्ट्रीट’ची दुर्दशा

महेंद्र महाजन

नाशिक : नाशिकला वाइन कॅपिटलचा दर्जा मिळवून देणाऱ्या गोवर्धन ते गंगावऱ्हे या ‘वायनरी स्ट्रीट’ ची त्रेधातिरपीट झाली आहे. रस्त्यांमध्ये खड्डे की खड्ड्यांचे रस्ते, अशी दैना अवस्था झालेली असतानाही दुरुस्तीकडे यंत्रणेच्या जोडीला लोकप्रतिनिधींचा काणाडोळा होत आहे. गोवर्धन ते गंगावऱ्हे रस्ता मध्यंतरी निधीच्या प्रश्नावरून चर्चेत आला होता. त्यामुळे त्याकडे ढुंकून पाहायचे नाही अशी भूमिका घेतली गेली काय, असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे.


या मार्गावर सुला विनियार्ड, सोमा, यॉर्क अशा तीन वायनरी, पाच रिसॉर्ट आणि नाशिकच्या प्रसिद्ध मिसळसह इतर हॉटेल इंडस्ट्री उभी आहे. स्थानिकांचे हाल नेहमीचे झाले आहेत. महिन्याला ३५ हजारांहून अधिक पर्यटक या रस्त्याने ये- जा करतात. त्यामुळे रस्त्यांकडे पाहून नाशिकच्या बाहेरून येणाऱ्यांच्या मनामध्ये नाशिकबद्दल काय प्रतिमा तयार होत असेल, याचा विचार रस्त्यावरील उद्यमांना करवत नाही.


महापालिकेच्या हद्दीतील रस्ता ठीक आहे. मात्र ‘वाय' आकाराच्या पुढे ८ किलोमीटरपर्यंत रस्त्याची चाळण झाली आहे. स्थानिक वायनरीजच्या माध्यमातून मध्यंतरी रस्त्यांची डागडुजी झाली, मात्र ही डागडुजी पहिल्या पावसात वाहून गेली. सध्य:स्थितीत या भागात वरुणराजा कोसळत असल्याने खड्ड्यांमध्ये तळी साचली आहेत. खडी उखडली आहे, यामुळे रस्त्याने वाहन चालवताना कसरत करावी लागते. जेसीबीच्या साहाय्याने स्थानिकांनी रस्त्याच्या कडेला नाले तयार करण्यात आले होते, पण तेही तकलादू ठरले आहेत. रस्त्याच्या एका बाजूने चढ असल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा होईल, अशी व्यवस्था करणे महत्त्वाचे बनले आहे. या रस्त्यावरील उद्यमांमधून सरकारला महसूल मिळत असताना नाशिकचे नाव होण्यासाठी मदत होत असताना सुद्धा गांभीर्याने रस्त्याची अवस्था ठीक का केली जात नाही, याचे कोडे काही केल्या उलगडत नाही.


जबाबदारी कोण घेणार?

जिल्ह्यातील विकासकामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध नाही, असे गाऱ्हाणे ऐकायला मिळत आहे. अशा परिस्थितीत ‘ वायनरी स्ट्रीट ’ ची अवस्था स्थापत्यशास्त्राच्या अंगाने ठीक करण्यासाठी कोण जबाबदारी घेणार, हा प्रश्‍न अनुत्तरीत राहतो. हा भाग ग्रामीण असल्याने जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद लक्ष देणार की नाही, याची स्थानिक व्यावसायिकांना प्रतीक्षा आहे. स्थानिकांकडून होणाऱ्या डागडुजी आणि सहभागाला मर्यादा असल्याने महसुलाचा विचार होणार की नाही, याचे उत्तर अर्थात, आगामी काळात मिळणे स्थानिकांना अपेक्षित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: १५ वर्षांच्या वैभव सूर्यंवशीसमोर बुमराहचा यॉर्कर अन् बाऊन्सरचा मारा! सरावावेळी नेमकं काय घडलं?

Civic Body Clash: स्वच्छता साहित्य डीबीटीने देणे अशक्य; महापालिका प्रशासनाचा फेरप्रस्ताव, स्थायी समितीशी संघर्षाची शक्यता

नितीन गडकरींना मुंबईतील वाहतूक कोंडीचा फटका; नियोजित कार्यक्रमात पोहोचण्यास तासभर उशीर; म्हणाले, जुन्या उड्डाणपुलांऐवजी...

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

Youth Sena Leader Car Crash: युवासेना पदाधिकाऱ्याच्या थारची दुचाकीला धडक; कामगार गंभीर जखमी, खर्च न दिल्याचा आरोप करत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT