nmc 123.jpg 
नाशिक

अतिरिक्त आयुक्तांकडून कार्यारंभाचे अधिकार स्वतःकडे; महापालिकेत अधिकाऱ्यांत नाराजी

विक्रांत मते

नाशिक : महापालिकेच्या कुठल्याही कामासंदर्भात कार्यारंभ आदेश द्यायचा असेल, तर संबंधित विभागप्रमुख किंवा अभियंता वर्गातील कार्यकारी अभियंता यांच्या स्वाक्षरीनेच प्रक्रिया पार पाडली जाते. भविष्यात कायदेशीर अडचण निर्माण झाल्यास न्यायालयात विभागप्रमुखांनाच उत्तरे द्यावी लागतात. मात्र आता महापालिकेत नवा पायंडा पाडला जात असून, नव्याने रुजू झालेले अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांनी स्वतःकडे अधिकार घेतल्याने अधिकारी वर्गात नाराजीला तोंड फुटले आहे. 

महापालिकेत अधिकाऱ्यांत नाराजी; संशयाचे वलय 
नगरसेवक किंवा आयुक्तांमार्फत विकासकामांचे प्रस्ताव सादर केले जातात. प्रस्ताव सादर झाल्यानंतर त्याचे प्राकलन तयार केले जाते. प्राकलन तयार झाल्यानंतर पाच लाखांच्या आत प्रस्तावाची किंमत असेल, तर विभागीय स्तरावर मंजुरी मिळते. प्रस्तावाची किंमत पाच लाखांपेक्षा अधिक असल्यास महासभा त्यानंतर स्थायी समितीवर मंजुरी मिळते. संबंधित कामाची निविदाप्रक्रिया राबविल्यानंतर पुन्हा स्थायी समितीची मंजुरी घेतली जाते. स्थायी समितीची प्रस्तावावर मोहोर उमटल्यानंतर कार्यारंभ आदेश दिले जातात.

संशयाचे वलय निर्माण

बांधकाम, पाणीपुरवठा व मलनिस्सारणासंदर्भातील सर्वाधिक प्रस्ताव असल्याने कार्यकारी अभियंता तर त्या-त्या विभागप्रमुखांच्या स्वाक्षरीने कार्यारंभ आदेश दिले जातात. महापालिकेच्या स्थापनेपासून याच पद्धतीने कामकाज सुरू असताना नव्याने रुजू झालेले अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांनी मात्र अधिकारांच्या या पद्धतीला ओव्हरटेक करत कार्यारंभ आदेश देण्याचे अधिकार स्वतःकडे घेतल्याने अधिकारीवर्गात नाराजी पसरली आहे. एखाद्या कामाबद्दल कायदेशीर अडचण निर्माण झाल्यास संबंधित अधिकाऱ्याला न्यायालयात खुलासा करावा लागत असल्याने कार्यारंभ आदेश देण्याचे अधिकारही त्याच अधिकाऱ्याकडे असणे अपेक्षित आहे. अतिरिक्त आयुक्त खाडे यांच्या या भूमिकेने त्यांच्याभोवती संशयाचे वलय निर्माण झाले आहे. 

स्थानिक विरुद्ध परसेवा विरोधाला धार 
महापालिकेत अतिरिक्त आयुक्तांपासून ते उपायुक्त या महत्त्वाच्या पदांवर परसेवेतील अधिकारी कार्यरत आहेत. यातून स्थानिक अधिकाऱ्यांना संधी मिळत नसल्याने नाराजी पसरली आहे. त्यात अतिरिक्त आयुक्त खाडे यांच्या कार्यारंभ आदेश स्वतः देण्याच्या भूमिकेवरून वादात आणखी भर पडली असून, स्थानिक विरुद्ध परसेवेतील अधिकारी विरोधाला नव्याने धार चढली आहे. 
 

नियमानुसारच अधिकार माझ्याकडेच

पाच ते दहा लाखांच्या प्रस्तावांचे कार्यारंभ आदेश देण्याचे अधिकार अतिरिक्त आयुक्तांनाच आहेत. मी नियमानुसारच अधिकार माझ्याकडे घेतले असून, यात चुकीचे काही नाही. -सुरेश खाडे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT