Bhausaheb Chaudhary along with Guardian Minister Dada Bhuse taking a ride in a rickshaw decorated on the occasion of the Rickshaw Beauty Contest. esakal
नाशिक

Rickshaw Beauty Competition : सौंदर्य स्पर्धेत प्रभाळे यांची रिक्षा प्रथम

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेबांच्या शिवसेनेतर्फे रिक्षा सौंदर्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत पंचवटीतील उमाकांत प्रभाळे यांच्या रिक्षाने प्रथम क्रमांक मिळविला. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर स्पर्धा झाली. (Prabhales rickshaw stood first in rickshaw beauty competition nashik news)

पालकमंत्री दादा भुसे, पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी, सहसंपर्कप्रमुख राजू लवटे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, महिला आघाडी जिल्हा संघटक लक्ष्मी ताठे, महिला आघाडी महानगरप्रमुख अश्विनी देशमाने, युवासेना महानगरप्रमुख दिगंबर नाडे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले.

महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांनी स्पर्धा भरविली होती. नाशिकसह पुणे, मुंबई, सोलापूर, कोल्हापूर, ठाणे या जिल्ह्यातून ३३८ रिक्षा सहभागी झाल्या. नाशिक विभागातून २१ हजार रुपयांचे प्रथम बक्षिस पंचवटीतील उमाकांत प्रभाळे यांच्या रिक्षाला मिळाले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

प्रमोद कडजेकर यांना दुसरा, सागर चौधरी तिसरा, श्रीपाद जाधव चौथ्या, तर सागर क्षत्रिय यांना पाचवे बक्षिस मिळाले. उत्तेजनार्थ पारितोषिक गोकूळ तांबडे, अनिल अष्टेकर, सुनील जोशी, चंद्रकांत पाटील, वसीम शेख, अजित गांगुर्डे यांना देण्यात आले.

मुंबई विभागातून इम्तियाज शेख यांना प्रथम, तर हनिफ शेख यांना द्वितीय पारितोषिक देण्यात आले. पश्चिम महाराष्ट्र विभागातून कोल्हापूरच्या सुनील नाळे यांनी प्रथम, तर अविनाश दिंडे यांच्या रिक्षाने द्वितीय पारितोषिक दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT