pre-wedding.jpg
pre-wedding.jpg 
नाशिक

प्री- वेडींग फोटोग्राफीची तरुणाईला पुन्‍हा भुरळ! निसर्गरम्य लोकेशन्सवर भर

दत्ता जाधव

पंचवटी (नाशिक) : कोविडची परिस्थिती व त्यामुळे जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे लग्नसराईचा गत हंगाम ठप्प झाला होता. याकाळात छोटेखानी लग्नसोहळे पार पडताना दिसले. परंतु आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत असताना आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असलेल्या विवाह समारंभाबाबत तरुणाईत उत्साह वाढला आहे. आपला विवाह हटके आणि अविस्मरणीय बनण्यासाठी प्री- वेडींग फोटोशूटपासून अन्य विविध नियोजन तरुणाईकडून आखले जाते आहे. 

विविध नियोजन तरुणाईकडून
सद्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्‍याने साखरपुडा, विवाह सोहळ्यांसह स्वागत समारंभालाही मोठी गर्दी होऊ लागली आहे. या सोहळ्याच्या आठवणी आयुष्यभर जपून ठेवण्यासाठी तरुण तरुणींमध्ये प्री- वेडिंग फोटोग्राफीसह व्हिडिओ शुटिंगला मोठी पसंती दिली जात आहे. त्यासाठी गंगापूर धरण परिसर असलेला बॅकवॉटरसह शहर परिसरातील निसर्गरम्‍य ठिकाणांना भेट देताना फोटोशूट व व्हिडिओग्राफी केली जाते आहे. त्यामुळे या ठिकाणांवर लक्षणीय गर्दी बघायला मिळते आहे.

निसर्गरम्य लोकेशन्सवर भर; कोविडच्या पार्श्‍वभूमीवर घेतली जातेय काळजी 
सोमेश्‍वर, तपोवन परिसरातही काहीजण त्यासाठी गर्दी करताना दिसून येतात. असे असले तरी सध्याचा कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, चित्रीकरणाद्वारे छायाचित्रकार, नवदांपत्‍यांकडून आवश्‍यक ती खबरदारी घेतली जाते आहे. यात प्रामुख्याने मास्‍क आणि सॅनिटायझरचा वापर करत कोरोनापासून बचावावर भर दिला जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: ...तर पेट्रोलचे दर 20 रुपयांनी वाढले असते; परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे वक्तव्य चर्चेत

RTE Maharashtra: पालकांना मोठा दिलासा! RTE च्या सुधारणेला हायकोर्टाची स्थगिती; नवे नियम तुर्तास होणार नाहीत लागू

Rohit Sharma IPL 2024 : सुट्टी नाही! मेगा लिलावासाठी रोहितला खेळावेच लागणार... माजी विकेटकिपरने कोणते संकेत दिले?

Share Market Closing: शेअर बाजाराने पुन्हा केली निराशा; मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये मोठी घसरण, गुंतवणूकदारांचे नुकसान

Naresh Goyal News : जेट एअरवेजचे चेअरमन नरेश गोयल यांना मोठा दिलासा! अखेर हायकोर्टाकडून जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT