Private hospital esakal
नाशिक

नाशिक : विविध प्रकारच्या चाचण्यांसाठी दर निश्चित

खासगी रुग्णालय, आस्थापनांच्या तुलनेत ३० ते ४० टक्‍क्‍यांनी दर कमी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महापालिका (Nashik Municipal Corporation) रुग्णालयात सिंहस्थ निधीतून बसविण्यात आलेल्या सिटी स्कॅन, एमआरआय मशिनच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या चाचण्यांसाठी दर निश्चित करण्यात आली आहे. खासगी रुग्णालय (Private hospital) व आस्थापनांच्या तुलनेत ३० ते ४० टक्‍क्‍यांनी दर कमी करण्यात आले आहे. वैद्यकीय विभागाने यासंदर्भात महासभेवर सादर केलेल्या दरसूची वर शिक्कामोर्तब करण्यात आले.

महापालिकेकडून नवीन बिटको रूग्णालयात सिंहस्थ निधीतून एमआरआय मशिन व सिटी स्कॅन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून विविध कारणांमुळे यंत्रणा सुरू नव्हती. यामध्ये दराचा महत्त्वाचा प्रश्न होता. विविध चाचण्यांचे दर निश्‍चित होत नसल्याने यंत्रणा सुरू नव्हती. यासंदर्भात वैद्यकीय विभागाने महासभेवर प्रस्ताव सादर केला होता. त्यात विविध चाचण्यांसाठी शासकीय दर निश्चित करण्यात आले. खासगी रुग्णालयांच्या तुलनेत ३० ते ४० टक्‍क्‍यांच्या दरम्यान चाचण्यांचे दर राहणार आहे. यापूर्वी शहर व ग्रामीण भागातील गरीब रुग्णांना जिल्हा रुग्णालयात चाचण्यांसाठी जावे लागत होते. आता महापालिकेने दर निश्चित करताना, यंत्रणा सुरू केल्याने शहर व परिसरातील गरीब रुग्णांना त्याचा मोठा लाभ होईल.

असे आहेत चाचण्यांचे दर (रुपयात)-

चाचणीचा प्रकार खासगी - दर महापालिकेचे दर

  • सिटी स्कॅन ब्रेन- २५०० - ८००

  • सिटी स्कॅन स्पाईन- ३ ते ६ हजार - १४०० ते १७००

  • सिटी स्कॅन नेक, फेस- ३ ते ६ हजार - १४०० ते १७००

  • सिटी स्कॅन चेस्ट- २५०० - ८००

  • सिटी स्कॅन अ‍ॅबडोमेन- ७५०० - २२०० ते ४५००

  • एमआरआय ब्रेन- २५०० - ८००

  • एमआरआय जॉइंट- ६००० - २३५०

  • एमआरआय, फेस, नेक, चेस्ट- ३ ते ६ हजार - १४०० ते १७००

  • एमआरआय युरोग्राफी- ६००० - २३५०

  • एमआरआय अ‍ॅबडोमेन- ६००० - २३५०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सारखेनंतर आता ताटातली पोळीही महाग; एका महिन्यात गव्हाच्या दरात तब्बल २०० रुपयांची वाढ

Ganesh Chaturthi 2026: आपण गणपती बाप्पा म्हटलं की ‘मोरया’ का म्हणतो? या जयघोषामागे आहे एका गणेशभक्ताची कहाणी

Ahilyanagar Crime: खर्ड्यात तान्हाजी बोराडे खूनप्रकरणाचा दोन दिवसांत छडा; १८ वर्षीय तरुणासह तीन अल्पवयीन ताब्यात

Marathi News Live Updates : तलावातून निघते गणरायाची पालखी; रायगडच्या साले गावातील अनोखी परंपरा

पतीचा मंगळदोष दूर करण्यासाठी पत्नीच्या प्रायव्हेट पार्टला हळदी कुंकू लावून...; भोंदूबाबाकडून अघोरी कृत्य, हुंड्यासाठी छळ

SCROLL FOR NEXT