nashik mahapalika.jpg 
नाशिक

भूसंपादनाच्या प्रक्रियेतही अधिकारांची लढाई सुरू 

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : स्थायी समितीकडून 157 कोटींचे भूसंपादनाचे प्रस्ताव मंजूर होण्यापूर्वीच राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून स्थगिती मिळाल्यानंतरही स्थायी समितीने न्यायालयीन प्रक्रियेतील कामे थांबविण्याचे आदेशित केले नसल्याचा अर्थ काढत आयुक्तांना स्थायी समितीवर अशा प्रकारचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्याने भूसंपादनाच्या प्रक्रियेतही अधिकारांची लढाई सुरू झाली आहे. 

न्यायालयाचे आदेश असलेले प्रस्ताव सादरच्या सूचना 
महापालिकेच्या अंदाजपत्रकात दर वर्षी भूसंपादनासाठी ठराविक आर्थिक तरतूद केली जाते. काही वर्षांपासून तो निधी खर्च न झाल्याने एकत्रित प्रस्ताव मंजूर करण्याचे नियोजन स्थायी समितीने केल्यानंतर त्यास सर्वपक्षीय नगरसेवकांनी विरोध करत महासभेत हा मुद्दा उचलून धरला. महापौर सतीश कुलकर्णी यांनीही स्थायी समितीवर परस्पर विषय सादर न करता महासभेवर प्रस्ताव ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. स्थायी समितीने अधिकाराचा मुद्दा उपस्थित करत प्रशासनाला स्थायी समितीवरच प्रस्ताव सादर करण्याचे आदेशित करताना 29 फेब्रुवारीला त्यासाठी विशेष सभा बोलाविली. त्यानंतर विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी शासनाच्या नगरविकास विभागाकडे पत्र देत भूसंपादनाच्या प्रस्तावांना स्थगिती देण्याची मागणी केली होती. त्यानुसार, गुरुवारी (ता. 27) शासनाकडून स्थगितीचे आदेश प्राप्त झाल्याने अधिकारांची लढाई सुरू झाली. स्थायी समिती सभापती उद्धव निमसे यांनी आयुक्त राधाकृष्ण गमे यांना निवेदन सादर करत न्यायालयाचे आदेश असलेलेच प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार शनिवारच्या सभेत भूसंपादनाच्या प्रस्तावासंदर्भातील निर्णयांकडे लक्ष लागले आहे. 

...तर न्यायालयाचा अवमान 
विकास आराखड्यातील आरक्षणे मुदतीत संपादित न केल्याने जागामालकांनी न्यायालयांमध्ये दावे दाखल केले आहेत. दाव्यांमध्ये न्यायालयाने तत्काळ भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करून अर्जदारास मोबदला देण्याचे आदेशित केले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार मुदतीत भूसंपादनाचा मोबदला अदा न केलेल्या प्रस्तावांना मान्यता न दिल्यास आयुक्त व स्थायी समितीवर न्यायालयीन आदेशाचा अवमान केला म्हणून याचिका दाखल होण्याची शक्‍यता आहे. यातून महापालिकेची नाचक्की होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्याचप्रमाणे खासगी वाटाघाटीद्वारे येणारे विषय सुस्पष्ट अभिप्रायासह वस्तुनिष्ठ अहवाल शासनाकडे पाठवावे, उच्च न्यायालयाने आदेशित केलेल्या प्रकरणात शासनाने कुठल्याही प्रकारची स्थगिती दिली नसल्याने मंजुरीसाठी असे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना स्थायी समिती सभापती उद्धव निमसे यांनी दिल्या. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Edible Oil Import Duty Cut : सूर्यफूल, सोयाबीन आणि पाम तेल होणार स्वस्त; केंद्र सरकारकडून खाद्यतेलाच्या आयात शुल्कात मोठी कपात, सामान्यांना दिलासा

धोनीचा असा जल्लोष परत कधीचं पाहिला नाही! पहिला T20 World Cup जिंकल्यावरच्या सेलिब्रेशनचा Viral Video

अजय देवगणच्या अडचणीत वाढ? मुंबईतील जुहू बंगल्यावर BMC कारवाई, पण नक्की कारण काय?

Congress MLA Resignation : मतदार संघात दुष्काळ जाहीर न केल्याने काँग्रेस आमदार पाटील यांचा राजीनामा

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट; अहेरी दक्षिण भागात मुसळधार पावसाची सुरुवात

SCROLL FOR NEXT