Mahaganpati News esakal
नाशिक

Ganeshotsav 2022 : वाजत गाजत नाशिकच्या महागणपतीचे आगमन

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : महागणपतीचे सोमवारी (ता.२९) वाजतगाजत आगमन झाले. सारडा सर्कल ते गाडगे महाराज पुतळा मेनरोडपर्यंत ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक काढण्यात आली. शेकडो भाविकांनी या वेळी मिरवणुकीत सहभागी होत दर्शनाचा लाभ घेतला. (Ganeshotsav 2022 Arrival of Maha Ganesha of Nashik Latest Marathi News)

शिवसेना युवक मित्रमंडळातर्फे महागणपतीचे दोन दिवसापूर्वीच आगमन झाले. सोमवारी आगमन सोहळा झाला. सारडा सर्कल, वाकडी बारावी, फुले मार्केट परिसर, दूध बाजार, भद्रकाली भाजी मार्केट, बादशाही कॉर्नर मार्गे गाडगे महाराज पुतळा मेनरोडपर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली.

ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. तत्पूर्वी माजी आमदार वसंत गीते, शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, शिवसेना ज्येष्ठ नेते सुनील बागूल, माजी महापौर विनायक पांडे, दत्ता गायकवाड, माजी उपमहापौर प्रथमेश गिते, ऋतुराज पांडे, नितीन रोटे पाटील यांच्या हस्ते आरती करण्यात आली. शेकडो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

महागणपतीचे वैशिष्ट्ये

शिवसेना युवक मित्र मंडळातर्फे स्थापना करण्यात येणाऱ्या नाशिकचा महागणपतीची मूर्तीची उंची २५ फूट उंच आहे. फायबरने तयार केलेली मूर्ती आहे. तर ३ हजार किलो मूर्तीचे वजन आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दीड वर्षांनंतर नरेंद्र मोदी अन् डोनाल्ड ट्रम्प यांची भेट! तिकडे अमेरिकेच्या कारवाईत तीन भारतीयांचा मृत्यू; देशात संताप

VIDEO : तुकाराम मुंढे यांचं रक्त काढून...! माजी राज्यमंत्र्याची अजब मागणी, मुख्य सचिवांना लिहिलं पत्र...

Vidhan Parishad Election : मतदानाला काही तास शिल्लक, काँग्रेस उमेदवाराचा डिजिटल प्रचार, पण पक्षाची भूमिका वेगळीच, नेमकं घडतंय काय?

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Waste Project Tender Issue : दक्षताच्या सूचना झुगारुन कचरा प्रकल्पाची निविदा; ठरावीक ठेकादारांना पायघड्या

SCROLL FOR NEXT