The work of making premix in Panchayat Samiti hall is going on by women for two days. esakal
नाशिक

Nashik News : पंतप्रधानांच्या महिला मेळाव्यात पेठच्या बचत गटाचा डंका! राज्यभर पोहोचणार ‘उमेद’चे उत्पादन

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आठवडाभरात मुंबईत नमो महिला सशक्तीकरण कार्यक्रम होत आहे. मेळाव्यासाठी येणाऱ्या लाखो महिलांना भेट स्वरूपात वस्तू देण्यात येईल. त्या वस्तू बनविण्याची ऑर्डर पेठ तालुक्यातील धोंडमाळ येथील पेठ जीवनज्योती महिला प्रभाग संघ गटाला मिळाली आहे.

नागली डोशाचे पीठ पाकिटांची तब्बल ७५ हजार एवढे प्रिमिक्स बनविण्याची ऑर्डर प्राप्त झाली. यामुळे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या ‘उमेद’च्या माध्यमातून उत्पादन राज्यभर पोहोचणार आहे.

ऑगस्टमध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या ‘उमेद’अंतर्गत १५ दिवसांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. (product will reach across state through Umed of Rural Development System nashik news)

पेठ तालुक्यातील ठराविक महिला बचत गटांना इडली आणि डोसा पिठाचे प्रिमिक्स बनविण्याचे तंत्र शिकविण्यात आले होते. संबंधित बचतगट आपापल्या परीने ठराविक ऑर्डर घेऊन पूर्ण करून देत असे. पेठच्या शेतात तयार होणारा तांदूळ, नागली, रवा आदींचा समावेश करून प्रिमिक्स करीत आहे.

त्यामुळे गावाकडील अन्नपदार्थाला मागणी वाढली. पेठच्या या गटाला राज्य शासनाकडून सर्वांत मोठी ऑर्डर प्राप्त झाली आहे. मुंबईत पुढील आठवड्यात पंतप्रधान मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत नमो महिला सशक्तीकरण मेळावा होत असून, त्यासाठी दीड लाख महिला उपस्थित राहतील. त्या महिलांना भेट स्वरूपात पेठ जीवनज्योती महिला प्रभाग संघ गटाने बनविलेल्या नागली डोसा यांचे २०० ग्रॅमचे प्रिमिक्स देण्यात येणार आहे.

यासाठी तीन दिवसांपूर्वी राज्य शासनाकडून पेठ जीवनज्योती महिला प्रभाग संघाशी संपर्क करीत ही ऑर्डर मिळाली. ऑर्डर मिळाल्यावर संघासमोर अडचणींचा डोंगर उभा रहिला.

मात्र, कमी वेळेत ऑर्डर पूर्ण करण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे गटाच्या मदतीसाठी धावल्या.

त्यांनी कच्चा माल, पॅकेजिंगचे साहित्य रातोरात उपलब्ध करून दिले. एक हजार ५०० टन नागली आदिवासी तालुक्यातून उपलब्ध करून ती दळून घेतली. यात तांदूळ, नागली, रवा आदींचा समावेश करीत पीठ तयार केले आहे. दोन दिवसांपासून साधारणपणे १५० महिला पंचायत समिती सभागृहात हे प्रिमिक्स पॅकिंग करीत आहेत. आतापर्यंत तब्बल ४५ हजार पॅकेट पूर्ण झाले आहेत.

"राज्य शासनाने ग्रामीण भागातील बचत गटाला मोठी संधी दिली आहे. या माध्यमातून पेठ तालुक्यातील बचत गटाच्या महिलांचे उत्पादन राज्यभर पोहोचण्यास मदत होईल. यानिमित्त नाशिकच्या बचत गटाच्या महिलांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे." - प्रतिभा संगमनेरे, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

१३ वर्षांपासून शारीरिक संबंध नाही, विकी डोनर बनवून ठेवलंय... टीव्हीच्या श्रीकृष्णाने पत्नीवर केलेले गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT