Nashik Police Commissioner ankush shinde latest news esakal
नाशिक

Nashik News : आयुक्तालय हद्दीमध्ये 15 दिवसांसाठी मनाई आदेश लागू

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी २७ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबरदरम्यान महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार शहर आयुक्तालय हद्दीमध्ये मनाई आदेश लागू केले आहेत. (Prohibitory orders apply within Commissionerate limits in nashik news)

राज्यातील विविध राजकीय पक्षातील फूट व त्यामुळे होणारे आरोप-प्रत्यारोप, त्याचप्रमाणे, सामाजिक, राजकीय वेगवेगळ्या प्रकरणे, महापुरुषांविषयी वादग्रस्त विधाने, त्यासंदर्भात निदर्शने यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारत येत नाही. ओबीसी, मराठा आणि धनगर समाज आरक्षणावरून राज्यात आंदोलनेही सुरू आहेत. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी १५ दिवसांसाठी शहरात मनाई आदेश लागू केले आहेत.

त्यानुसार नागरिकांना कोणतेही दाहक किंवा स्फोटक पदार्थ सोबत नेता येणार नाही. दगड, शस्त्र, लाठ्या, बंदुका बाळगता येणार नाही.

कोणत्याही व्यक्तीचे प्रतिकात्मक प्रेतांचे किंवा प्रतिमेचे प्रदर्शन किंवा दहन करता येणार नाही. आरडाओरड, वाद्य वाजवण्यास बंदी असेल. प्रक्षोभक भाषण, वर्तवणुकीस बंदी घालण्यात आली आहे.

सार्वजनिक ठिकाणी महाआरती करणे, वाहनांवर झेंडे लावून फिरणे, पेढे वाटणे, फटाके फोडणे, घंटानाद करणे, शेरेबाजी करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. पूर्वपरवानगी शिवाय पाच किंवा पाचपेक्षा जास्त नागरिकांना एकत्र जमण्यास, सभा घेण्यास किंवा मिरवणूक काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. या आदेशांचे उल्लंघन करणारे महाराष्ट्र पोलिस कायदा १९५१ चे कलम १३५ नुसार शिक्षेस पात्र राहतील, असा इशाराही आयुक्तांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT