Police Promotion esakal
नाशिक

Nashik News : पदोन्नती झालेल्या सहायक आयुक्तांना प्रतिक्षा पदस्थापनेची!

नरेश हळणोर

नाशिक : राज्यातील ३२ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सहायक पोलीस आयुक्तपदी पदोन्नती देण्यात आली आहे, परंतु, दीड महिना उलटूनही त्यांची पदस्थापन करण्यात आलेली नाही. सहायक आयुक्तपदी पदोन्नती होऊन या अधिकाऱ्यांना पोलीस निरीक्षकाचीच जबाबदारी पार पाडावी लागत असल्याने त्यांना पदस्थापनेच्या आदेशाची प्रतिक्षा लागून राहिली आहे.

यात नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील दोन तर महाराष्ट्र पोलीस अकादमीतील एका पोलीस निरीक्षकाचा समावेश आहे. (promoted Assistant Commissioner waiting for posting maharashtra News)

गेल्या ९ डिसेंबर रोजी अपर पोलीस महासंचालकांच्या आदेशाने राज्यातील ३२ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या पदोन्नतीने सहायक पोलीस आयुक्त तथा उपअधीक्षकपदी बढती देण्यात आली. त्यानुसार त्यांच्या बदल्यांचे आदेशही जारी केले आहेत.

परंतु, त्यांची पदस्थापना करण्यात आलेली नाही. सदरील आदेशाला दीड महिन्यांचा कालावधी उलटला आहे. त्यामुळे शासनाला पदोन्नतीने सहायक आयुक्त करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची पदस्थापना करण्याचा विसर पडला की काय, असा सवाल उपस्थित होतो आहे.

कोरोनामुळे महाराष्ट्र पोलिस दलातील पदोन्नती व बदल्यांचे सत्र थांबले होते. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र पोलिस दलातील बदल्याचे सत्र सुरू आहे. त्याचप्रमाणे, पदोन्नतीने बदल्याही केल्या जात आहेत.

मात्र त्यातही वारंवार फेरबदल होत असल्याने बदली झालेल्या अधिकाऱ्यांच्याही पुढच्या दोन दिवसात पुन्हा बदल्यांना सामोरे जावे लागते आहे. त्यात पदोन्नतीने बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची पदस्थापनाच न करण्यात आल्याने त्यांच्यासमोरही मोठा पेच उभा राहिला आहे.

हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील दोन तर महाराष्ट्र पोलीस अकादमीतील एका पोलिस निरीक्षकाची सहायक आयुक्तपदी पदोन्नतीने बदली करण्यात आलेली आहे. परंतु ते पदस्थापनेच्या प्रतिक्षेत आहेत. त्याशिवाय त्यांना सध्याच्या कार्यरत ठिकाणाहून पदमुक्तही होता येत नाही.

१७५ अधिकाऱ्यांची होणार पदोन्नती

महाराष्ट्र पोलीस दलातील १७५ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सहायक पोलीस आयुक्तपदी पदोन्नती मिळणार आहे. यापैकी ३२ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना पदोन्नतचे आदेश जारी झाले आहेत. तर उर्वरित पोलिस निरीक्षकही पदोन्नतीच्या आदेशाच्या प्रतिक्षेत आहेत. या पदोन्नती सेवा संवर्गानुसार होत असल्याने त्यास काहीसा विलंब होत असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Birth Death Registration Rules : जन्म-मृत्यू नोंदीला दोन वर्षे विलंब, तर न्यायालयाचे दार ठोठावे लागणार; केंद्राचे नवे कडक नियम लागू, गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

SCROLL FOR NEXT