corona.png 
नाशिक

चिंताजनक! शहरात कोरोनाबाधितांमध्ये युवकांचे प्रमाण अधिक; वाचा सविस्तर

विक्रांत मते

नाशिक : आजारी किंवा रोग प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींना कोरोनाची भिती अधिक असल्याचे सांगितले जाते. तरी काळजी न घेतल्याने तरुणांमध्ये कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे महापालिके च्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. मे ते जुन महिन्यात ६० पेक्षा अधिक वयोगटात कोरोनाबाधितांचे प्रमाण अधिक होते परंतू आता तरुणांमध्ये बाधितांचे प्रमाण अधिक असल्याने ही बाब चिंता निर्माण करणारी आहे.

बाधितांमध्ये महिलांचे प्रमाण ४४.५३ 

एप्रिल महिन्यात शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर मेपर्यंत कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात होती. त्यानंतर मात्र दर दिवशी कोरोनाबाधितांच्या आकडेवारीने विक्रम मोडीत काढले. मंगळवारी (ता. 8) शहरात ११३४ कोरोनाबाधित आढळल्याने एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ३१ हजार ९२१ पर्यंत पोहोचली आहे. एकुण बाधितांपैकी २६,६५६ रुग्णांना उपचार करून घरी सोडण्यात आले. सध्या ४,७१७ रुग्ण पालिका व खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. बाधितांमध्ये पुरुषांचे प्रमाण ५५.४७ टक्के आहे, तर महिलांचे प्रमाण ४४.५३ टक्के आहे.

तरुणांमध्येच कोरोनाचे प्रमाण अधिक

तरुणांमध्ये रोगप्रतिकारशक्ती अधिक असल्याने कोरोना संसर्ग होण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले जात असले तरी नाशिकमध्ये प्रत्यक्षात तरुणांमध्येच कोरोनाचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले आहे. २१ ते ६० या वयोगटातील १७,४३५ तरुण कोरोना बाधित आढळले आहेत. एकुण प्रमाण ५३ टक्के आहे. 

असे घेरले कोरोनाने तरुणाईला 
वयोगट कोरोनाबाधित 

० ते १० १०१५ 
११ ते २० १९२३ 
२१ ते ३० ४२५७ 
३१ ते ४० ५१५६ 
४१ ते ५० ४२३६ 
५१ ते ६० ३७८६ 
६१ पेक्षा अधिक २३९४ 

संपादन - किशोरी वाघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT