Dwarka Circle esakal
नाशिक

Dwarka Smart Signal : द्वारका सर्कलचा घेर कमी करण्याचा प्रस्ताव फेटाळला

सकाळ वृत्तसेवा

Dwarka Smart Signal : मुंबई नाक्याबरोबरच द्वारका येथेही मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार होत असल्याच्या पार्श्वभूमीवर रस्ता सुरक्षा समितीने द्वारका सर्कलचा घेर कमी करण्याचा सादर केलेला प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने फेटाळला आहे.

त्यामुळे या भागात सुशोभीकरणासह अन्य विकासकामे करता येणार नाही. (proposal to reduce perimeter of Dwarka circle was rejected nashik news)

शहरामध्ये मुंबई नाका, द्वारका, एबीबी सर्कल, जेहान सर्कल, गंगापूर नाका, अशोकस्तंभ, नाशिक रोड भागातील चौकात मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी होऊन वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार घडतात.

असे रस्ते वाहतूक समितीने नियुक्त केलेल्या एजन्सीकडून सर्वेक्षणाअंती स्पष्ट करण्यात आले आहे. त्यात द्वारका येथील सध्या अस्तित्वात असलेल्या सर्कलजवळ फ्लायओवरवर चालणारे व उतरणारे स्लीप रोड समोरासमोर असल्याने तसेच द्वारका सर्कल येथे सिग्नल यंत्रणा कार्यान्वित असल्याने त्या ठिकाणचे सर्कल काढून अन्य उपाययोजनेचा अभ्यास करावा अशा सूचना देण्यात आल्या होत्या.

त्याअनुषंगाने सादर करण्यात आलेल्या अहवालामध्ये द्वारका सर्कल संदर्भात उपाययोजना सूचविण्यात आल्या आहे. यामध्ये द्वारका सर्कलचा व्यास तीन वेळा कमी करण्यात आला असेल.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

द्वारका सर्कल खाली विविध सर्विसेस असल्याने यापेक्षा अधिक घेर कमी करणे शक्य नसल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

द्वारका सर्कलवर स्मार्ट सिग्नल

द्वारका सर्कल चौकात सध्या महापालिकेच्या विद्युत विभागाकडून सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.

या सिग्नल यंत्रणेमुळे काही प्रमाणात वाहतूक नियंत्रणात येत असली तरी शंभर टक्के उपाय नाही. त्यामुळे द्वारका सर्कल चौकात स्मार्टसिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनतर्फे स्मार्ट सिग्नल बसविले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Crime News : कोल्हापुरात विकृती वाढतेय! दागिन्यांसाठी नातवाने आजीला चहातून विष पाजलं; पोलिसांनी अवघ्या काही तासात लावला छडा

‘भूत बंगला’मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार मिथिला पालकर; साकारणार 'ही' भूमिका

Terrorist Junaid Ahmad : तुरुंगातील कैद्यांना भडकवणारा मास्टरमाईंड अद्याप मोकाट! दहशतवादी जुनैद अहमदला पकडण्यासाठी NIA कडून पाच लाखांचे रोख बक्षीस जाहीर

High Court Nagpur Bench: सासरच्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा वाढता ट्रेंड; नागपूर खंडपीठाचा कडक इशारा! काय होतं प्रकरण?

Kolhapur Foundries : कोल्हापुरात ‘ग्रीन कास्टिंग’चा पथदर्शी प्रकल्प; पश्चिम विभागाचे अध्यक्ष वीर अडवाणी, फाउंड्रीतील निर्यात वाढणार

SCROLL FOR NEXT