covid center 123.jpg 
नाशिक

कोविड सेंटरसाठी मंगल कार्यालय देण्याची तयारी! पाळदे कुटुंबाचा स्वतःहून पुढाकार 

वाल्मिक शिरसाट

नाशिक / देवळाली कॅम्प : नाशिक तालुक्यातील ग्रामीण भागात कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या रुग्णालयाशिवाय इतर सुविधा नाहीत. अशात, बोर्डाच्या रुग्णालयात जागेचा प्रश्न सोडविण्यासाठी कोविड रुग्णांकरिता मंगल कार्यालय प्रशासनाला देण्याची तयारी पाळदे कुटुंबीयांनी दाखविली आहे. त्यामुळे पंचक्रोशीतील नागरिकांनी जिल्हा प्रशासनाकडे कोविड सेंटर उभारण्याची मागणी केली आहे. 

ग्रामीण रुग्णांसाठी लहवितच्या पाळदे कुटुंबाचा स्वतःहून पुढाकार 
देवळाली कॅम्प परिसरात कोविड रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून, अनेक रुग्णांना उपचाराकरिता खासगी दवाखान्यांकडे धाव घ्यावी लागत आहे. देवळाली कॅम्प व पंचक्रोशीतील दोनशेपेक्षा जास्त रुग्ण शहर, नाशिक रोडसह ठिकठिकाणी उपचार घेत आहेत. कोविड रुग्णांनी कॅन्टोन्मेंट बोर्डाला दवाखान्याबाबत विचारणा केल्यानंतर जागा नसल्याने घरी अथवा अन्यत्र राहण्याची सूचना देण्यात येते. भगूर-लहवित मार्गावर अष्टविनायक लॉन्स असून, जवळ कोणतीही नागरी वस्ती नाही. दोन एकरांपैकी ३० गुंठ्यांवर असलेल्या मोठ्या शेडमध्ये शंभर रुग्णांची राहण्याची व्यवस्था होऊ शकते.

देवळाली कॅम्पसह भगूर, लहवित, लोहशिंगवे, वंजारवाडी, राहुरी, दोनवाडे, संसरी, शेवगेदारणा, बेलतगव्हाण आदी गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर असल्याने रुग्णांच्या घरातील सदस्यांसह आरोग्य प्रशासनाला सोयीस्कर ठरणार आहे. वाहतुकीच्या दळणवळणाच्या सुविधा सोयीस्कर उपलब्ध होऊ शकत असल्याने अष्टविनायक लॉन्स कोविड सेंटरसाठी घ्यावे याकरिता जिल्हा प्रशासनाला पत्र देणार असल्याचे संचालक वैभव पाळदे यांनी सांगितले. 

मुख्यमंत्र्यांना साकडे 
कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने देवळालीसह पंचक्रोशीकरिता शंभर खाटांचे कोविड सेंटर उभारणे गरजेचे आहे. शासनाच्या आरोग्य विभागाला याबाबत मागणी पूर्वीच केली असून, अष्टविनायक लॉन्स येथे तातडीने सेंटर उभारावे याकरिता मुख्यमंत्र्यांशी फोनकरून मागणी केल्याचे माजी आमदार योगेश घोलप यांनी सांगितले.  

संपादन - ज्योती देवरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT