Court esakal
नाशिक

Nashik News : विनयभंगाच्या आरोपातून तत्कालीन प्रांताधिकारी निर्दोष!

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : महसूल विभागात खळबळ उडविणाऱ्या येथील महिला तलाठ्याने केलेल्या विनयभंगाच्या आरोपातून तत्कालीन प्रांताधिकारी सोपान कासार यांची वरिष्ठस्तर न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. (provincial officer free from molestation charges nashik news)

तलाठ्याने उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यावर केलेल्या विनयभंगाच्या या आरोपामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष याकडे लागले होते. श्री. कासार हे २०२१ मध्ये महसूल उपविभागात प्रांताधिकारी म्हणून कार्यरत होते. सायगाव येथील महिला तलाठीने श्री. कासार यांनी विनयभंग केल्याची तक्रार शहर पोलिसांत १६ ऑगस्ट २०२१ मध्ये दाखल केली होती.

त्यावरून प्रांताधिकारी कासार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आपण बदलीस पात्र नसतानाही प्रांताधिकारी कासार यांनी ज्येष्ठतेचे नियम डावलून नांदगाव तालुक्यात बदली केली होती. ही बदली रद्द करण्याच्या बहाण्याने प्रांताधिकारी कासार यांनी शरीरसुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप या तक्रारीमध्ये संबंधित तलाठी महिलेने केला होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

वरिष्ठस्तर न्यायालयामध्ये या प्रकरणाची सुनावणी प्रथम वर्ग न्यायाधीश एम. एस. लिगाडे यांच्यासमोर झाली. सरकार पक्षातर्फे आठ साक्षीदार तपासले. या प्रकरणाचा तपास शहर पोलिस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक संदीप कोळी व नितीन खडांगळे यांनी केला.

प्रांताधिकारी कासार यांच्यातर्फे विधिज्ञ ॲड. शंतनू कांदळकर व ॲड. राहुल कासलीवाल यांनी बाजू मांडली. ३ ऑगस्ट २०२३ ला न्यायालयाने या प्रकरणातील तथ्य तपासून प्रांताधिकारी कासार यांची निर्दोष मुक्तता केल्याची माहिती ॲड. कांदळकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Phaltan Politics:'फलटण पालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकणार'; राजे गट अन् शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांचा एकदिलाने लढवण्याचा निर्धार..

माेठी बातमी! 'फलटण तालुक्यातील दाेन केमिकल कंपन्यांना भीषण आग'; सव्वाआठ कोटींचे नुकसान, पळापळी अन् काय घडलं !

Latest Marathi News Live Update : मालेगावातील भीषण घटनेच्या निषेधार्थ पाचोडमध्ये आक्रोश मोर्चा!

Kagal crime News: शेतजमिनीच्या वादातून वृद्धाला आणि एका महिलेला मारहाण, या दोन परस्‍परविरोधी तक्रार कागल पोलिस ठाण्यात दाखल

Satara fraud:'कार विकून अनेकांना गंडा घालणाऱ्यांना अटक'; बनावट कागदपत्रांद्वारे सांगली, कोल्हापूर, निपाणी आदी ठिकाणी व्यवहार

SCROLL FOR NEXT