Kirtan Pattern for teaching esakal
नाशिक

Nashik News: ग्रामीण भागात कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती! संवाद वाढविण्यासाठी डिसले गुरुजी पॅटर्न

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्याबरोबरच पालक व विद्यार्थ्यांमध्ये संवाद घडवून आणण्याचा पॅटर्न ग्रामीण भागात राबविणेदेखील तितकेच गरजेचे झाल्याने महापालिका शिक्षण विभागाकडून ग्रामीण भागात कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे.

सायंकाळी सात ते नऊच्या दरम्यान टिव्ही व मोबाईल बंद ठेवण्याचा डिसले पॅटर्न राज्यभरात राबविण्यासाठी महापालिकेने पावले उचलली आहे. (Public awareness through Kirtan in rural areas Disley Guruji pattern to enhance communication Nashik News)

महापालिकेच्या विद्यार्थ्यांना स्मार्ट करण्यासाठी सोलापुर जिल्ह्यातील डिसले गुरुजी पॅटर्न अमलात आणण्यास सुरवात करण्यात आली आहे.

आधुनिक युगाशी मोबाईल व टीव्हीच्या माध्यमातून विद्यार्थी, पालक जोडले गेले असले तरी त्याचे दुष्परिणाम म्हणून कुटुंबातील एकमेकांचा संवाद घटत आहे.

संवाद पुर्ववत करण्यासाठी महापालिकेच्या शाळेत जवळपास ३५ हजार विद्यार्थी व ८३५ शिक्षकांना सांयकाळी सात ते नऊ वेळेत घरी टीव्ही, मोबाईल न वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.

या वेळेत पालकांनी टीव्ही, मोबाईल बंद ठेवून विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घ्यायचा. यावर केंद्रप्रमुख, शिक्षकांना लक्ष ठेवणे बंधनकारक आहे.

शिक्षकांना विद्यार्थ्याच्या घरी जाऊन उपक्रमाची अंमलबजावणी होते की, नाही यासंदर्भात शहानिशा करावी लागतं आहे. शिक्षकांनी उपक्रमाकडे दुर्लक्ष केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाधिकारी बी. टी. पाटील यांनी दिला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्याचबरोबर वाढते दप्तराचे ओझे लक्षात घेऊन महापालिकांच्या शाळांमध्ये दर शनिवारी ‘दप्तरमुक्त शनिवार’ उपक्रमदेखील राबविण्यास सुरवात करण्यात आली आहे. शनिवारी शाळेत दप्तर आणण्याऐवजी शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्याने आयोजित करण्याच्या सूचना आहेत.

संवादाची आवश्‍यकता

ग्रामिण भागात टिव्ही, मोबाईलची क्रेझ शहरी भागापेक्षा अधिक आहे. त्यामुळे पूर्वीच्या कीर्तन, जागरणाची जागा टीव्ही, मोबाईल या अत्याधुनिक साधनांनी घेतली आहे.

या साधनांचा वापर कमी करून कुटुंबात संवाद साधला जावा, या हेतूने महापालिकेकडून कीर्तनकार संस्थांना आवाहन करून ग्रामिण भागात महापालिकेच्या उपक्रमाचे मार्केटिंग करण्याची विनंती करण्यात आल्याची माहिती श्री. पाटील यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi NIA Custody : अनमोल बिश्नोईला ११ दिवसांच्या NIA कोठडी!, पटियाला हाऊस कोर्टाचा निर्णय

Pakistan Involvement in Red Fort Blast : अखेर पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा फाटलाच! दिल्ली स्फोटातील सहभागाची नेत्यानेच दिली कबूली

Petrol Pump : पेट्रोल पंप संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचा निर्णय मागे; पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा निर्णय

Mundhwa Land Case : मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानींचा जबाब नोंदविला

Pravin Darekar : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला गती; सहकाराला आधुनिकतेची जोड द्यावी

SCROLL FOR NEXT