crime23.jpg 
नाशिक

तोंडावरील मास्क ओढल्याच्या वादातून तरुणावर तलवारीने हल्ला

प्रमोद सावंत : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : (मालेगाव) तोंडावरील मास्क ओढल्याच्या वादातून सुरु झाली बाचाबाची...संतापाची आग अशी पेटली की थेट केला 'असा' धक्कादायक प्रकार.. वाचा नेमके काय घडले?

असा आहे प्रकार

मालेगाव शहरातील श्रीरामनगर भागात किरकोळ वादातून तरुणावर तलवारीने हल्ला करण्याचा धक्कादायक प्रकार घडला. तोंडावरील मास्क ओढल्याच्या वादातून दोन तरुणांमध्ये झालेल्या बाचाबाचीचे पर्यवसान हाणामारीत झाले. यातून विजय गोसावी (वय २३) या तरुणावर रवी परदेशी व त्याच्या साथीदाराने विजयच्या कानावर व डाव्या डोळ्यावर तलवारीने वार केले. तसेच लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. 

नेमके काय घडले?

विजय हा मारुती मंदिरासमोर रवी परदेशी याच्या मित्राशी बोलताना विजयने त्याच्या तोंडाचा मास्क ओढला. त्याचा राग आल्याने मित्राने रवीला घरी जाऊन हा प्रकार सांगितला. रवीने मास्क ओढल्याची कुरापत काढून घरातून तलवार आणत वार केले तर त्याच्या साथीदाराने लाकडी दांड्याने मारहाण केली. रविवारी रात्री हा प्रकार घडला. सोमवारी विजय गोसावीच्या तक्रारीवरून कॅम्प पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी रवीला अटक केली आहे. 

संपादन - किशोरी वाघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT