exam 123.jpg
exam 123.jpg 
नाशिक

महत्वाची बातमी : महाविद्यालयीन निकालाचा मार्ग मोकळा.. विद्यापीठाने ठरविले "हे' सूत्र

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाने महाविद्यालयीन स्तरावरील परीक्षा रद्द ठरविल्या होत्या. परीक्षाच झालेली नसल्याने निकालही प्रलंबित होते. आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष 2019-20 मधील दुसऱ्या सत्रातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या निकालाचे गणितीय सूत्र निश्‍चित केले आहे. त्यानुसार प्रथम ते अंतीमपूर्व परीक्षांचा निकाल जाहीर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.अंतीम वर्ष, अंतीम सत्रातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार नसल्याचे यापूर्वीच जाहीर केलेले असले तरी अशा विद्यार्थ्यांना निकालासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे. अंतीम वर्ष, अंतीम सत्राच्या विद्यार्थ्यांच्या निकालाचे सूत्र विद्यापीठ लवकरच जारी करेल, असे स्पष्ट केले आहे.

समितीच्या शिफारशी शासनाने केले स्वीकृत

पुणे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी पुणे, नाशिक व नगर जिल्ह्यातील सर्व संलग्न महाविद्यालयाच्या प्राचार्य, संचालकांना यासंदर्भात पत्र पाठवत माहिती कळविली आहे. त्यानुसार प्रथम वर्ष ते अंतीमपूर्व परीक्षांच्या निकालाचे गणितीय सूत्र निश्‍चित केले असल्याचे नमूद केले आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभुमिवर लॉकडाऊन काळात सर्व अकृषी विद्यापीठाच्या शैक्षणिक वेळापत्रकांचे नियोजन करणे व परीक्षांकरीता एक सामाई योजना करण्यासाठी समिती गठीत केली होती. या समितीच्या शिफारशी शासनाने स्वीकृत केले होते.

ग्रेड मुल्यमापनावर आधारीत

त्यानुसार अंतीम वर्षातील विद्यार्थी वगळून पदविका, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना मिळणारी ग्रेड ही 50 टक्‍के अंतर्गत मुल्यमापनावर आधारीत आणि 50 टक्‍के पूर्वीच्या सत्रांतील परीक्षेचे गुण (उपलब्ध असल्यास) घेऊन ठरविली जाणार आहे. त्याकरीता विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने तयार केलेल्या गणितीय सूत्रास विद्यापरीषद, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, व्यवस्थापन परीषद या विद्यापीठाच्या अधिकार मंडळांनी मान्यता दिलेली आहे. त्यानुसार प्रथम ते अंतीमपूर्व परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

हेही पाहा> VIDEO : मुलाच्या विवाहाचा आनंद..अन् विधानसभा उपाध्यक्षांच्या नृत्याची झलक..एकदा बघाच!

परीपत्रकातील महत्त्वाच्या बाबी-
- प्रथम ते अंतिमपूर्वी वर्षातील सम (2,4,6) सत्रातील विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले जातील. विषम सत्रांतील विद्यार्थ्यांच्या निकालाचे मूल्यमापन केले जाणार नसून, अशा सत्रांची परीक्षा परीस्थितीचे आकलन करून घेतली जाईल.
- अंतीम वर्ष, अंतीम सत्रातील विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाणार नाही. अशा विद्यार्थ्यांच्या निकालासाठीचे सूत्र लवकरच कळविले जाईल.
- बॅकलॉक आणि रिपीटर विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला जाणार नाही. अशा विद्यार्थ्यांची परीक्षा परीस्थिती सुधरल्यानंतर घेतली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT