pune university.jpg 
नाशिक

Sakal Impact : पुणे विद्यापीठाकडून शुल्कवाढीला स्थगिती...पण

सकाळवृत्तसेवा

नाशिक : अनुदानित व विनाअनुदानित अभ्यासक्रमांसाठी जाहीर केलेली शुल्कवाढ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अखेर स्थगित केली आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत शुल्कवाढ मागे घ्यावी, असे पालक-विद्यार्थ्यांचे मत असल्याचे वृत्त "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाले होती. त्याची दखल घेत विद्यापीठाने शुल्कवाढीच्या निर्णयाला स्थगिती दिली असून, विद्या परिषदेच्या या निर्णयास व्यवस्थापन परिषदेची मंजुरी घेऊन अंतिम निर्णय जाहीर केला जाणार आहे. 

व्यवस्थापन परिषदेची भूमिकादेखील महत्त्वाची...

विद्यापीठाच्या विद्या परिषदेची (ऍकॅडमी कौन्सिल) बैठक शनिवारी (ता. 23) झूम ऍपद्वारे झाली. सध्याच्या परिस्थितीविषयी चर्चा करताना अन्य विविध विषयांवर या बैठकीत चर्चा झाली. कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आर्थिक संकट ओढावलेले आहे. अशा स्थितीत विविध अभ्यासक्रमांची नियोजित शुल्कवाढ विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अडचणीची ठरू शकते. त्यामुळे शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये जाहीर केलेली शुल्कवाढ मागे घेण्यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली. त्यानुसार शुल्कवाढीला स्थगिती देण्याचा प्रस्ताव व्यवस्थापन परिषद (मॅनेजमेंट कौन्सिल) पुढे सादर केला जाणार आहे. शुल्कवाढ स्थगितीची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी व्यवस्थापन परिषदेची भूमिकादेखील महत्त्वाची असेल. दरम्यान, विद्या परिषदेने शुल्कवाढीला स्थगिती दिल्याने आता व्यवस्थापन परिषदेतही शुल्कवाढ स्थगित करण्यावर जवळपास शिक्‍कामोर्तब झालेले आहे. 

आगामी शैक्षणिक वर्षात विद्यापीठातर्फे नियोजित शुल्कवाढीच्या स्थगितीचा प्रस्ताव विद्या परिषदेकडून प्राप्त झाल्यास, व्यवस्थापन परिषद याबाबत विचार करेल. सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे कुठलाही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी विद्यापीठ निश्‍चित घेईल. शुल्कवाढीला स्थगिती मिळाल्यास विद्यार्थी-पालकांना दिलासा मिळेल. - विजय सोनवणे, सदस्य, व्यवस्थापन परिषद  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway: मुसळधार पावसाने मुंबई-गोवा महामार्ग दुसऱ्या दिवशीही ठप्प; कशेडी घाटात दरड; रोहा, माणगावमध्ये पाणी साचले, ताम्हिणी घाटही बंद

Mohan Bhagwat: मुलांना आजी-आजोबांकडे सोपवा : डॉ. मोहन भागवत; ‘गुगलबाबा’ऐवजी कौटुंबिक संस्कारांवर भर

Latest Marathi News Live Update : पुढील दोन दिवस कोकण किनारपट्टी, पुणे, मुंबईसह घाटमाथ्याला रेड अलर्ट; हवामान विभागाचा इशारा

MSRTC: वारकऱ्यांसाठी धावणार १२६० जादा बस; पंढरपूरच्या वारीसाठी ‘एसटी’चे मराठवाड्यातील नियोजन

Nanded: नांदेड- टनकपूरदरम्यान विशेष रेल्वेची सुविधा

SCROLL FOR NEXT